संघर्ष वाहिनीचे ‘दे धक्का’ आंदोलन आजपासून

0
12

गोंदिया,दि. ११ः-मत्स्य सहकार महर्षि खासदार जतिराम बर्वे यांच्या १00 व्या जयंती महोत्सवाचे वर्ष सुरू असतानाच महाराष्ट्र सरकारने शून्य मैल नागपूर येथील विदर्भ मच्छिमार संघाची इमारत व त्यांची कर्मभूमी जमीनदोस्त केली. या कृत्याचा निषेध व अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर दे धक्का मोर्चाचे आयोजन संघर्ष वाहिनीतर्पेष्ठ ११, १३ व १५ जून रोजी करण्यात आले आहे.
११ जून रोजी सकाळी १0 वाजता अजुर्नी मोरगाव, दुर्गा चौक, आंबेडकर चौक आमगाव आणि समाजभवन, कहार मोहल्ला तिरोडा येथून ह्यदे धक्का मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयावर नेण्यात येणार आहे. तर १३ जून रोजी शेंडा चौक सडक अजुर्नी, ठाणा रोड गोरेगाव आणि बस स्टँड सालेकसा तसेच १५ जून रोजी जि.प. पटांगण, चिचगड रोड देवरी आणि सिव्हील लाईन सुभाष बागेच्या मागे, गोंदिया येथून हे दे धक्का मोर्चे निघणार आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व संबंधित तालुक्यातील संघर्ष वाहिनीचे यशवंत दिघोरे, राधेश्याम मेर्शाम, जीवनलाल मेर्शाम, प्रफुल्ल ठाकरे, हसनलाल वलथरे, विनोद कागदीमेर्शाम, गणराज नान्हे, तुलाराम कुराडे, राजाराम मेर्शाम, हरकुजी भानारकर, देबीलाल घुमके, शेंडे, महेश अहिरकर, हेमराज चैतराम मेर्शाम, प्रल्हाद खंगार, संपत खंगार, राजेंद्र बर्वे, रविंद्र देवगडे, छगनलाल मांढरे, किसन मेर्शाम, परेश दुरुगवार, जयचंद नगरे, अनिल मेर्शाम, सुंदरलाल लिल्हारे, मनिराम मौजे, देलाल शेंडे, ब्रिजलाल मौजे आदी आप-आपल्या तालुक्यात मोचार्चे नेतृत्व करून तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करतील.
३0 जून २0१७ चा अन्यायकारक निर्णय रद्द करून तलाव/जलाशय ठेका रक्कम ३00 रुपये करावी, नीलक्रांती योजनेचे १२.१७ कोटी रुपयांपैकी ९.४७ कोटी रुपये हे पिंजरा पद्धती व खाद्य कारखाना यावरील नियोजित रक्कम रद्द करावी व गरीबांसाठी आलेली सबसिडीची रक्कम जाळे, होड्या, मत्स्यबीज, संवर्धन यावर खर्च करावी आदी मागण्या असल्याचे भटके, विमुक्त संघर्ष परिषदेचे मुख्य संयोजक दीनानाथ वाघमारे आणि गोंदिया जिल्हा संयोजक माणिक गेडाम यांनी कळविले आहे.