माहिती हवीय मग माहितीचा अधिकार लावा-सालेकसा आरएफओ

0
13

गोंदिया,दि.११-जलयुक्त शिवारयोजनेसह इतर योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता असावी यासाठी शासन ईनिविदेच्यामाध्यमातून सर्वच कामे करीत आहे.सोबतच शासकीय पोर्टल व वेबसाईटवर ऑनलाईन माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश देत असताना वनविभागाच्यावतीने सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या कामांची माहीती मात्र हवी असल्यास आधी पत्र द्या किंवा माहितीच्या अधिकारात अर्ज करा तेव्हाच माहिती मिळेल असे सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.जी.अवगान यांचे म्हणने आहे.अवगान यांच्या या भूमिकेमुळे सालेकसा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या कामामंध्ये गौडबंगाल तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असतानाही श्री अवगान हे आपल्या सालेकसा येथील कार्यालयात दुपारी १२.३० वाजेपर्यंत पोचलेच नव्हते.परंतु भ्रमणध्वनीवर मात्र मी बाहेर आहे हे स्पष्टपणे सांगितले.त्यातच त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचाèयांनी मात्र साहेब गोंदियाच्या मुख्य कार्यालयात असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.तेव्हा गोंदिया येथील कार्यालयात विचारणा केल्यावर श्री अवगान हे गोंदिया उपवनसरंक्षक कार्यालयात आलेच नसल्याचे सांगण्यात आले.तर अवगान हे सुट्टीच्या दिवशी नागपूरला आपल्या गावी जात असल्याने त्यांना सोमवारला सालेकसाला पोचायला खंरतर उशीर झाला हे कारण कर्मचारी लपविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांची फसगत झाली.सोबतच असलेली माहिती आम्ही देऊ शकत नाही असेही सांगितले.जोपर्यंत साहेब आदेश देणार नाही तोपर्यंत जलयुक्त शिवार योजनेतील कामाची माहीत तसेच २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये करण्यात आलेल्या वनतलाव व खोदतलावाची माहीती देता येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर यामाहितीसाठी श्री अवगान यांच्याशी संपर्क साधण्यात आल्यावर त्यांनी माहिती हवी असल्यास गोंदिया मुख्यालयातून घ्या अन्यथा माहितीचा अधिकार लावूनच माहिती दिली जाईल अशी माहिती देता येणार नाही अशी भूमिका घेतल्याने वनविभागातील पारदर्शक प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.जनतेच्या माध्यमातून आणि त्यांच्या समोर ही कामे होत असताना प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी वनविभागाला संकोच का प्रश्न निर्माण झाला आहे.