नगरसेवकाच्या मृत्यूप्रकरणाला घेवून आदिवासी समाजाचा १३ रोजी मोर्चा

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.11 : येथील नगरपंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यूप्रकरणाला घेवून आदिवासी समाजबांधवांच्या वतीने अर्जुनी मोरगाव येथे १३ जून रोजी सकाळी ११ वाजता धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेले मसराम हे पुढील अडीच वर्ष कालावधीसाठी अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार होते. परंतु, आदिवासी समाजातील नगरसेवक अध्यक्ष होऊ नये, म्हणून त्यांचा कटकारस्थान करून काटा काढण्यात आला. २० मे रोजी त्यांची हत्या करून मोटारसायकलने अपघात झाल्याचा देखावा करण्यात आला. ज्या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आला, तिथे राजकीय दबावतंत्राचा वापर करून प्रकरण दडपण्याचा प्रकारही सुरू आहे. संथगतीने सुरू असलेला तपास त्वरित सीबीआयकडे वळती करण्यात यावा,मारेकर्यांना फाशीची शिक्षा व त्यांच्या सहकार्यांना त्वरित अटक करण्यात यावी तसेच मसराम यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, आदिवासी समाजावर होणार्या अन्यायाविरूद्ध योग्य न्याय मिळण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या मोच्र्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पिपल्स पेâडरेशन नागपूरचे अध्यक्ष दिलीप मडावी,गोंदियाचे अध्यक्ष एन.डी. किरसान, व्ही.एस. सयाम, राजेंद्र मरस्कोल्हे, धर्मराज भलावी,गोवर्धन ताराम, मंदाताई वुंâभरे, शिलाताई उके, नाजूक वुंâभरे, बाबुराव काटेंगे, गजानन कोवे, पंचम भलावी, लीलाधर ताराम, तुलाराम मारगाये, प्रभुदास प्रधान, सुधाकर घोडाम यांच्यासह आदिवासी पिपल्स पेâडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी हलबा-हलबी संघटना, आदिवासी वुमन्स पेâडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघटना, आदिवासी बिरसा मुंडा सेवा समिती आदींनी केली आहे.