भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकरसह कुटुंबातील पाचजणांची हत्या

0
12

नागपूर,दि.11: नागपूरच्या दिघोरी येथे मध्यरात्री एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी दोन लहान मुलं आणि वृद्धेचाही खून केल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी ७ वर्षीय मितालीचा अखेरचा आधारही हरविला आहे. चार वर्षापूर्वी बापाने तिच्या आईची हत्या केली होती. त्यामुळे लहान भाऊ व मिताली मामाच्या आसऱ्याने नागपूरला राहत होते. मात्र रविवारच्या मध्यरात्री क्रूरकर्म्याने हा शेवटचा आधारही हिरावून घेतला. आज घटनेनंतर जमलेल्या नातेवाईकांच्या गराड्यात मिताली एकटी पडली होती.
दिघोरीतील आराधना नगरात ही घटना घडली. आराधना नगरात राहणारे कमलाकर पवनकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची मध्यरात्री झोपेत असताना हत्या करण्यात आली. यात एक लहान मुलगा, लहान मुलगी आणि वृद्धेचा समावेश आहे. या तिघांचीही तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये पवनकर यांच्यासह त्यांची पत्नी अर्चना, मुलगी वेदांती, भाचा गणेश आणि आई मीराबाई यांचा समावेश आहे.  पवनकर हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या हत्येचं वृत्त कळताच त्यांनी आराधना नगरात गर्दी केली आहे.कमलाकर यांच्या आईला आरोपींनी फरफटत स्वयंपाकगृहात घेवून गेले. तिथे त्यांची हत्या केली. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने नागरीकांत भितीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच नागपूर हे शहर आहे. तिथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून नागपूर शहराचा क्राईमग्राफ वाढत आहे.

इतक्या निर्दयीपणे कुणी शत्रुलाही मारू नये, अशा विक्षिप्तपणाने त्याने स्वत:च्या बहिणीच्या कुटुंबाचा घात केला. यात त्याने स्वत:च्या पोरालाही संपविले. मिताली मात्र वैष्णवीसोबत वेगळी झोपली असल्याने त्याच्या क्रौर्यापासून बचावली. आधी आईपासून आणि आता मामाच्या आसऱ्यापासून मिताली पोरकी झाली.