भ.वि.समाजाच्या संघर्ष वाहिनीचे ‘दे धक्का’ आंदोलन

0
10

तिरोडा,दि.14ः-विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती/जमाती व मच्छिमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष वाहिनीतर्फे  तिरोडा येथे ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान केंद्र व राज्य शासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांसह राज्याचे वित्तमंत्री, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री, भटक्या विमुक्त जाती मंत्री व भजाविमा प्रभागाचे मंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती/जमाती, मच्छिमार समाजाच्या समस्यांना घेवून सरकार नेहमीच चर्चा करून आश्‍वासन देत असते. मात्र, आश्‍वासनाच्या पलीकडे सरकाराने काहीच केले नाही. एवढेच नव्हे तर उपाययोजनासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना साधे चर्चेकरिता बोलाविले नाही, असा आरोप संघर्ष वाहिनीने केला आहे. यासाठी राज्यव्यापी ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात येत आहे. यानुरुप तिरोडा येथे संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व दीनानाथ वाघमारे, महेश अहिरकर, शिवानंद तुमसरे, रविंद्र देवगडे, प्रकाश भलावी, वंदना बोंदरे, शामकला शेंडे, हेमराज मेश्राम, विजय उकेबोंदरे, भाऊलाल तुमसरे, संपत हंगार, मधुकर देवगडे, ईश्‍वर बावणे, जगदीश सोनेवाने यांनी केले. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना देण्यात आले.