लाखनी येथील दिव्यांग मुलांच्या शिबिरात स्वप्नपुर्तीकडून भोजनदान

0
15

लाखनी,दि.14ः-आजचे चिमुकले हे उद्याचे नागरीक आहेत, काही चिमुकले दिव्यांग असतात, या दिव्यांग चिमुकल्या मुलांना देखील उद्याचे सक्षम नागरीक म्हणून घडविण्यासाठी लाखनी तालुक्यातील मुरमाडी/ला. येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक उत्तर बुनियादी शाळेत दिव्यांग मुलांसाठी  २ ते १५ जून दरम्यान गट साधन केंद्र लाखनीच्या वतीने हे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिराला स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या टिमने १३ जून रोज बुधवारला भेट देत स्वप्नपुर्तीच्या वतीने त्यांना भोजनदान करण्यात आले. स्वप्नपुर्तीच्या पदधिकार्यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांसह भरपूर वेळ घालवला, विविध वस्तु बनवत विद्यार्थी त्यात रममान झाले होते. नंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कला शिकविल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने नृत्य, गायन, वादन, हस्तकला, चित्रकला, पाढे म्हणणे, प्रार्थना म्हणणे, कविता गायन करने, भाषाकौशल्य, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनवने अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. हे शिबिर संपुर्णतः मोफत असून लोकसहभागातून साकारले आहे. आणि यासाठी सहा. शिक्षक रशेषकुमार फटे, हितेंद्र बोंद्रे, आणि आयोजक मंडळतर्फे विषयतज्ञ म्हणून एच.एस.कारेमोरे, कु.यू.जी.खोब्रागडे तसेच विशेष शिक्षक म्हणून एन.आर.झाडे, एम.डी.आग्रे, एन.जी.नखाते, टी.एल.निमजे, एन.एम.सेवक, कु.ए.वी.पाटिल, डब्लू.डी.कापगते आदी शिक्षक परिश्रम घेत आहेत.  या शिबिराला स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने दिलेल्या भेटीदरम्यान स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सल्लागार अतुल पाटील भांडारकर, डॉ. चन्द्रकांत निम्बार्ते, संजय वनवे, उमेश सिंगणजुडे, डॉ. गणेश मोटघरे, सदस्य शाम पंचवटे, नितेश टिचकुले, अंजली भांडारकर, स्मिता सिंगणजुडे, संदीप भांडारकर, अनिकेत नगरकर, भीष्मा लांडगे, दिक्षा जमाईवार, अनन्या भांडारकर उपस्थित होते.