‘इव्हीएस मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे’

0
19

ब्रम्हपुरी,दि.15ः- विविध राज्यांमध्ये इव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जात आहे. मात्र, हे मशीन पारदश्री नसल्याने मतदार व विविध पक्षांचे नेते तसेच निवडणुकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने इव्हीएस मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावी, अशी मागणी एस.सी., एस.टी., ओबीसी कृती संसाधन समितीने तहसीलदार सोनाली आडेपवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यशवंत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी, राज्य कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग द्यावा, अँट्रॉसिटी कायदा सक्षम करावा, संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित करावा, सामान्य विद्यापीठातून बहिर्गत विद्यार्थी म्हणून परीक्षा देता यावी, अतिक्रमीत घरमालकांना पट्टे द्यावेत, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
निवेदन देताना निलकंठ झाडे, ईश्‍वर जनबंधू उपस्थित होते. निवेदनावर मोतीलाल देशमुख, सुदाम राठोड, योगेश नंदनवार, सचिन लोखंडे आदी कार्यर्त्यांच्या स्वाक्षह्या आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले आहे.