पंतप्रधान मोदींनी साधला पांजरावासीयांशी संवाद

0
8

गोंदिया,दि.१६ :संपूर्ण देश डिजिटल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या माध्यमातून टेक्नालॉजीच्या सहायाने सर्वसामान्यांचे जीवन सुलभ केले आहे. मागील चार वर्षात या डिजिटल क्रांतीने काय साध्य केले हे १५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या संवादातून संपूर्ण देशात घडलेल्या बदलाला देशवासीयांना प्रत्यक्ष बघता आले.
गोंदिया जिल्ह्यात पांजरा या गावात कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आलेल्या अनुभव प्रत्यक्ष पंतप्रधानांनी एैकून घेत त्यांच्याशी चर्चा केली. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सीएससी केंद्राचे संचालक सुशील नागपुरे यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी मराठीतून सुरुवात केली. नंतर सर्वांना कळावे म्हणून हिदीतून बोलायला सांगितले. सुशिलशी बोलताना त्यांनी कुठून बोलताय, शिक्षण आदी माहिती घेतली. यावर सुशिलने महाराष्ट्रातील पांजरा या ३ हजार लोकसंख्या असलेल्या गावातून बोलत असल्याचे सांगून एमकॉमपयर्ंत शिक्षण झाल्याचे सांगितले. तसेच वायफाय चौपाल व सीएससी केंद्रामुळे मला रोजगार मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी सीएससी केंद्रातील चमू ही गणवेशात दिसताच पंतप्रधानांनी त्यांचे कौतूक करत व्यवसायिकता ही फार गरजेचे असल्याचे सांगितले.  तरूण रंजीत गोंडाणे याने पंतप्रधानांशी संवाद साधताना सांगितले की, मी सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. मला वायफाय चौपालमुळे गावात अध्ययनाचा खूप फायदा होत आहे.  रंजीतने गावातच इंटरनेटच्या माध्यमातून तयारी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर अनुसयाबाई नागपुरे या वृध्द महिलेशी संवाद साधताना त्यांनी विचारपूस केली असता या केंद्रामुळे पेंशन आता गावातच मिळत असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी साधलेला हा संवाद सहा मिनिटाचा होता. देशात अनेक ठिकाणी सीएससी केंद्र, बीपीओ, एनकेएन, एनआयसी, माय गव्ह. वॉलिटीअर, मोबाईल उत्पादक कंपनीत काम करणारे विद्यार्थी अशा अनेक लाभार्थ्यांशी एकाच वेळी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.