खा. कुकडे यांची रेल्वे अधिकार्‍यांशी समस्यांवर चर्चा

0
12

गोंदिया,दि.१६ :अल्पावधीत जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार मधुकर कुकडे हे निवडणुकीच्या निकालानंतर हारर्तुेच्या स्वागत कार्यक्रमांच्या नादी न लागता, कामाला लागले आहेत. (दि.१४) खासदार कुकडे यांनी मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती शोभना बंडोपाध्याय यांच्याशी जिल्ह्यातील रेल्वेसंदभार्तील समस्यांना घेवून चर्चा केली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड यांच्यासह सुज्ञ नागरिकांनी खासदार कुकडे व प्रबंधक श्रीमती बंडोपाध्याय यांना अनेक समस्यांची प्रत्यक्ष जाणीव करून दिली. दरम्यान, रेल्वे प्रशासन समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नरत राहणार, अशी ग्वाही श्रीमती बंडोपाध्याय यांनी दिली. विशेष म्हणजे, खासदार कुकडे यांच्या बोलाविण्यावर रेल्वे प्रबंधक गोंदियात आले.
खासदार कुकडे यांनी गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यांना घेवून रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीसाठी मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती शोभना बंडोपाध्याय ह्या गोंदिया येथे आल्या होत्या. बैठकीदरम्यान इंदौर-पुरी हमसफर रेल्वेगाडी व पुरी-लोकमान्य टिळक रेल्वेगाडीचा थांबा गोंदिया येथे देण्यात यावा, गोंदिया रेल्वे स्थानक प्रवेशद्वारकडे येणार्‍या गुजराती समाजवाडी या रस्त्याचा पयार्यी रस्ता तयार करण्यात यावा, पुणे-नागपूर-पुणे गरीब रथ रेल्वेगाडीचे विस्तार गोंदियापयर्ंत करण्यात यावे या प्रमुख समस्यांना घेवून त्यांनी चर्चा केली.
त्याचप्रमाणे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया येथील मालधक्का गोडावून अन्यत्र स्थानांतरीत करण्यात यावे, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण करण्यात यावे तसेच त्या स्थानकावरुन प्रमुख रेल्वेगाड्यांचा थांबा देण्यात यावा, गोरेगाव व आवश्यक त्या रेल्वेस्थानकावर फूट ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावे, रेल्वेच्या अधिनस्त असलेल्या तलावांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, भंडारा रेल्वेस्थानकावर रँक पाईंट सुरू करण्यात यावी, डोंगरगड, बालाघाट, शेगाव या शहरांसाठी रेल्वेचा परिचालन सुरू करण्यात यावा आदी रेल्वेच्या समस्या मांडून चर्चा करण्यात आली.
एवढेच नव्हे गोंदिया रेल्वेस्थानक परिसराचा फेरफटका मारून प्रत्यक्ष समस्यांची जाणीवही अधिकार्‍यांना करवून देण्यात आली. या बैठकीत अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक वाय. एच. राठोड, वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ अभियंता अशोक सूर्यवंशी यांच्यासह रमनकुमार मेठी, विनोद हरिणखेडे, अशोक शहारे, शिव शर्मा, अशोक चौधरी, शकील मंसुरी, सुरज गुप्ता, नानु मुदलीयार, जनकराज गुप्ता, चंद्रिकापुरे, किशोर तरोणे आदी कार्यकर्ते व सुज्ञ नागरिक उपस्थित होते.