तालुक्यात पोलिस पाटलांची पदे त्वरित भरा

0
8

अजुर्नी/मोरगाव,दि.15ः- गावाचा गावगाळा सांभाळता यावा, गावात शांतता व सुव्यवस्था आबाधीत राहावी यासाठी प्रत्येक गावात पोलिस पाटलांची नियुक्ती असते. मात्र गोंदिया जिल्ह्यातील अजुर्नी मोरगाव व सडक अजुर्नी या दोन तालुक्यात तब्बल ४२ पोलिस पाटलांची पदे रिक्त असून गावपातळीवरील या महत्वाच्या पटलाच ग्रहण लागल्याचे चित्र आहे. दरम्यान संबंधीत दोन्हीत तालुक्यात अपेक्षीत अशा पोलिस पाटलांची त्वरित नियुक्ती करावी, असे मागणी अजुर्नी मोरगाव पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांनी अजुर्नी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
अजुर्नी मोरगाव व सडक अजुर्नी तालुक्यात पोलिस पाटलांची १५ पदे मंजूर असून सध्या १७३ पोलिस पाटील कार्यरत आहेत. तर ४२ पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. यामध्ये सडक अजुर्नी तालुक्यात ५ पोलिस पाटिलांच्या जागा रिक्त आहेत. तर अजुर्नी मोरगाव तालुक्यात ३७ पोलिस पाटलांची जागा रिक्त आहेत.
यामध्ये अजुर्नी मोरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत १२ जागा, नवेगावबांध पो.स्टे. अंतर्गत १२ जागा तर केशोरी पो.स्टे. अंतर्गत १३ जागा रिक्त आहेत. सध्या गावागावांमध्ये तंटामुक्त गाव समित्या असून त्या समितीमध्ये गावातील पोलिस पाटीलांची भूमीका अत्यंत महत्वाची असते. मात्र दोन्ही तालुक्यात अनेक वषार्पासून काही गावात पो.पा. पदाच्या जागा रिक्त आहेत.
पोलिस पाटील पदाच्या जागा महसूल विबागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्पत भरल्या जातात. मात्र अजुर्नी जागा भरण्यासंदर्भात कसलीच कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे रिक्त असलेल्या पोलिस पाटलांच्या जागा त्वरित भरण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन सभापती अरविंद शिवणकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्या संदर्भात पाच वेळा उपविभागीय अधिकार्‍यांना स्मरण पत्र सुध्द ा सभापती शिवणकर यांनी दिले आहे.