आदर्श गावासाठी प्रस्तावित भुसारीटोलाला राज्यस्तरीय समितीची भेट

0
13

सडक अर्जुनी दि.१६ :: कृषी विभागाकडून राबविण्यात येणाNया ‘आदर्श गाव’ या उपक्रमाकरीता भुसारीटोला या गावाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले. प्रस्तावित भुसारीटोल्याच्या मूल्यमापनासाठी  आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाNयांनी भेट दिली. दरम्यान, नागरिकांशी संवाद साधून गावाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर विभागाकडून ‘गाव आदर्श’च्या संकल्पनेनुरूप कामांचा आढावाही घेण्यात आला. समितीच्या भेटीनंतर भुसारीटोलावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी विभागाकडून ‘आदर्श गाव संकल्प’ या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील काही गावांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील भुसारीटोला या गावाचा समावेश असल्याने आज राज्यस्तरीय समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उपसंचालक महादेवराव निंबाळकर यांच्यासह पदाधिकाNयांनी गावाला भेट दिली. दरम्यान, विकास आराखड्यानुरूप समितीच्या पदाधिकारी व अधिकाNयांनी मुल्यांकन केले. शिवारपेâरी करून पाणलोट क्षेत्र, भातखाचर, मामा तलावांचे नूतनीकरण, वनराई बंधारे, नाला बांधकाम आदी बाबीची माहिती घेतली. त्याचप्रमाणे रस्ते, सांडपाणी निकासी नाली, पाणी टाकी, वृक्ष संगोपन, नागरिकांचे राहणीमान या बाबीची पाहणी करून सविस्तर चौकशी केली. यानंतर समितीच्या अधिकारी,पदाधिकाNयांनी नागरिकांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे आदर्श गाव संकल्पनेला साकार करण्यासाठी पार्वती बहुउद्देशिय विकास संस्थेची निवड करावी का, असाही सल्ला नागरिकांकडून घेतला.यावेळी समितीचे सदस्य सुरेंद्रचंद्र बागडे, चंद्रकांत गोरे, संतोष डोळस, कृषी अधिकारी तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी आकरे, कृषी सहायक कु. पंचभाई, वनपरिक्षेत्र अधिकारी नागपुरे,कु. चाचेरे, खुणे, बहुउद्देशिय संस्थेचे डिलेश्वर रहांगडाले, सरपंच उमाकांत गहाणे, भुमेश्वर वैद्य आदी उपस्थित होते.