रूग्णालय पावतीची दरवाढ त्वरित मागे घ्या,राष्ट्रवादीचे निवेदन

0
9

गोंदिया दि.१६ :: येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात रूगण तपासणी पावतीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी,अशीमागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली. यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.जिल्हा सामान्य रूग्णालयात गरीब व गरजू रूग्ण उपचारासाठी येतात. यासाठी त्यांना रूग्णालयाची १० रूपयांची पावती घ्यावी लागते. मात्र १ जून पासून या पावतीचे दर दुप्पट वाढविण्यात आले असून त्यासाठी २० रूपये शुल्क आकारले जाते. आधीच वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला यामुळे अधिक भुर्दंड बसत आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. शिवाय जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधी उपलब्ध असताना सुध्दा रूग्णांना बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. महागाईमुळे जनता त्रास असताना रूग्णालयातही आर्थिक पिळवणूक होत असून त्यांच्या अन्याय होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. यामुळे रूगणालयाने वाढविलेले रूग्ण तपासणी पावतीचे शुल्क कमी करण्यात यावे, अन्यथ या विरूध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.पक्षाचे शहर उपाध्यक्ष नागेंद्रनाथ चौबे यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी बलकवडे यांची भेट घेवून या विषयावर चर्चा केली तसेच त्यांना मागणीचे निवेदन दिले. शिष्टमंडळात नत्थुसिंग भट्टी,चचंगल चौबे, महेश भालोटिया,रमेंद्र जायस्वाल, सतीशसिंग भट्टी,राजेंद्रसिंग भट्टी, सिटुसिंग भट्टी,गोल्डी चौकवायत, सतपालसिंग भट्टी, पंकज बैस, ओंकार वैष्णव, शुभम नेवारे, बिस्सू तिवारी, दिपक बैस, हरशरणसिंग गौर, नवीन अग्रवाल, रोषण बैस, पवन बैस, रॉकी राठोड, नितुसिंग भट्टी, अमरसिंग भट्टी राजेश कापसे व कार्यकर्ता उपस्थित होते.