दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी अपंगांचे आंदोलन

0
14

तूमसर दि.१७ :: नगर परिषदेवर अपंगांच्या ३ टक्के निधीसाठी तसेच दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी ११ वाजता अपंग बांधवांचे कासरा-तुतारी आंदोलन प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनाची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ नगरपरिषद हद्दीतील अपंग बांधवांची नोंदणी करून येत्या ८ दिवसात ३%निधी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले तसेच व्यापारी गाळेसाठी अनुशेष भरून त्याचेही वाटप अपंग बांधवांना करण्यात येईल असे आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने दिले.
या आंदोलनासाठी भंडारा जिल्ह्यातील व तुमसर येथील अपंग बांधव प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे विदर्भ प्रमुख श्री हनुमंतराव झोटिंग; प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुहाडकर, प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे भंडारा जिल्हाध्यक्ष रवि मने, योगेश्वर घाटबांधे, धनराज घुमे, शंकरदादा बडवाईक, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमूख राजेश पाखमोडे, मंगेश वंजारी, विजय बर्वे, सुनिल कहालकर, शिवदास वाहने, चरणदास सोनवणे, एकनाथ बाभरे, रंजन तिरपुडे व सर्व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.