मृत व्यक्तीच्या नावावर खोटी स्वाक्षरी करून देयके लाटण्याचा प्रकार

0
33
धडक सिंचन विहीर बांधकामातील घोटी येथील प्रकार
डेप्युटी अभियंत्यासह शाखा अभियंत्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.20ः-शासनाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात ११००० धडक qसचन विहीर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत होणाèया बांधकामाची पाहणी आणि लाभाथ्र्यासोबत भेट न करताच उपविभागीय अभियंता व शाखा अभियंते हे त्या बाधकांमाच्या मोजमापपुस्तिकेवर स्वाक्षरी करून देयके काढत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्याचे असे की,गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत येत असलेल्या गोंदिया उपविभागातील गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील एका मृत पावलेल्या लाभार्थी शेतकèयाच्या नावावरील विहीर बांधकामाचे शेवटचे १ लाख ३५ हजार ६४५ रुपयाचे देयके काढताना कुठलीही चौकशी न करता दोन्ही अभियंत्यांनी  स्वाक्षरी केल्याने धडक qसचन विहिरीच्या शासकीय निधीच्या गैरव्यवहाराला पाqठबा दिल्याची घटना उघडकीस आली आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वकर्मा आणि उपविभागीय अभियंता नीलिमा मंडपे यांना विचारणा केल्यानंतरही त्यांनी यावर आपली कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.
सविस्तर असे की,गोरेगाव तालुक्यातील घोटी(जानाटोला) येथील नत्थू डोकु भगत यांच्या शेतातील गट नंब.१८९,१९० मध्ये धडक सिंचन योजनेतंर्गत विहीर मंजूर झाली.त्या विहिरीचा कार्यारंभ आदेश ६ जून २०१७ रोजी देण्यात आला होता.त्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गोंदिया उपविभागीय अभियंता नीलिमा मंडपे यांच्या स्वाक्षरीने २३ एप्रिल २०१८ रोजी देण्यात आले.वास्तविक लाभार्थी शेतकरी नत्थु भगत यांचे डिसेंबर २०१७ मध्येच निधन झालेले असतानाही लघुपाटबंधारे विभागाने मृत शेतकèयाच्या कुटुंबांकडून मृत्यू प्रमाणपत्र व वारसान प्रमाणपत्राची मागणी न करताच मृत लाभार्थींच्या नावे द्वितीय व अंतिम देयकाला मंजुरी दिली आहे.वास्तविक लाभार्थी शेतकèयाचा मृत्यू हा डिसेंबर २०१७ मध्ये झालेला असतानाही त्या लाभार्थींच्या नावावर बोगस स्वाक्षèया करून हा निधी हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे.त्यातच सदर शाखा अभियंता व उपविभागीय अभियंत्यांनी बांधकामाची वेळोवेळी मौका चौकशी केली नसल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे.घोटी येथील नथू भगत यांचा हे प्रकरण गोरेगाव पंचायत समितीने उघडकीस आणले असून तत्कालीन बीडीओनी सदर प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिस कारवाई करण्याबाबत संबंधित विभागाकडे पत्रही पाठविले.त्यानंतरही संबंधित लघु पाटबंधारे विभागाने या प्रकरणाकडे का दुर्लक्ष केले हे अद्यापही न उलगडणारे कोडे ठरले आहे.
त्यातच नत्थू भगत यांचा मृत्यू डिसेंबर २०१७ मध्ये झालेले असताना त्या आधी त्यांच्या मोजमापपुस्तिकेवरील लाभार्थी म्हणून असलेल्या स्वाक्षèया आणि मृत्यूनंतरच्या अंतिम देयकावर असलेल्या लाभाथ्र्यांच्या स्वाक्षरीमध्ये साम्य असल्याने लाभाथ्र्यांच्या नावे त्यांच्या कुटुंबातील कुठल्यातरी सदस्याने खोटी स्वाक्षरी करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामध्ये केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गोरेगाव पंचायत समिती कार्यालयाने दिलेल्या अहवालात मोजमाप पुस्तिकेची तपासणी केली असता मोजमाप पुस्तिका क्रमांक ८३६ पान क्रमांक ४ वर शाखा अभियंता यांनी ४ मे २०१८ रोजी मोजमाप केले.त्यावेळी संबंधित लाभाथ्र्याचा मृत्यू झालेला असल्यावरही सदर देयकावर लाभाथ्र्यांची स्वाक्षरी असल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत सहनिशा होणे गरजेचे होते.त्यातच वारसानाचे दस्तऐवज सादर न करता देयके मंजूर करणे योग्य नाही.आणि लाभार्थी मृत पावल्यावरही देयक मंजुरीस्तव खोटी स्वाक्षरी करून सादर करणे ही शासनाची दिशाभूल करण्याची बाब असल्यामुळे सदर प्रकरणात पोलिस कार्यवाही करण्यासंबंधी ८ जून रोजी उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग गोंदिया यांना पत्र देण्यात आले आहे.त्या पत्राला १० दिवसाचा काळ लोटूनही कुठलीच कारवाई अद्यापही या विभागाने केलेली नाही.