आमसभा तहकुबीने नगरसेवक नाराज

0
7

गोंदिया ,दि.21ः-नगर परिषदेत २0 जून रोजी होणारी आमसभा वेळेवर तहकुब झाल्याने सत्त्ता पक्ष व विपक्षी नगरसेवकांची नाराजी पाहायला मिळाली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी व या दरम्यान होणार्‍या विकासकामांचे ठराव व अनेक विषय या सभेत होणार होते. मात्र ऐनवेळी सभा तहकुब झाल्याचा निरोप मिळाल्याने अनेक नगर सेवकांनी आता ही सभा केव्हा होणार व पुढील मुहरुत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोंदिया नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे. सत्ता परिवर्तनानंतर गोंदिया शहराच्या विकासकामांना मोठी गती मिळाली आहे. मात्र शहरातील वॉर्डार्वाडार्तील समस्या व विकासकामे रखडली जाऊ नये यासाठी आमसभा महत्वाची असल्याने दरमहिन्याला आमसभा घेण्याचे नियम आहेत. विकासासाठी आमसभा ही दर महिन्याला व्हावी असा पत्रच प्रभाग क्र.१२ च्या भाजपच्या नगरसेविकेने १४ जून रोजी चक्क जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे. तसेच नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी देखील कर्तव्याला बुट्टी मारून कार्यालयाऐवजी घरूनच परिषदेचे कामकाज चालवित आहेत, असाही आरोप भाजपच्या नगरसेविका मोसमी सोनछात्रा यानी पत्राद्वारे केला आहे. यात त्यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी ध्रुव चचाने यांच्या बाबतीत तक्रार केली आहे. आजच्या होणार्‍या आमसभेत शहरातील अनेक विकास कामांच्या संदभात चर्चा व ठराव होणार होते. मात्र आचारसहिता संपल्यानंतर विकासकामांना गती देण्यासाठी आजची आमसभा महत्वाची ठरणार होती. ही सभा न झाल्याने विपक्षी नगरसेवक नगरपरिषद परिसरात नाराजीच्या सुरात चर्चा करतांना दिसून आले.