नगर पंचायत अंतर्गत विकासकामांना सुरुवात

0
21

गोरेगाव,दि.25ः-येथील नगर पंचायत अंतर्गत विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी तिरोडा -गोरेगाव विध्यानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार, उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, बांधकाम सभापती शामली जायस्वाल, महिला व बालकल्याण सभापती शोभा लटये, पाणीपुरवठा सभापती हिरण झंझाड, गटनेते हिरालाल रहांगडाले, मधुबाला साखरे, उषा रहांगडाले, सीमा कटरे, राजू टेंभुर्णीकर, सया मारबते, सुरेंद्र पटले, रेवेंद्र बिसेन, भुमेश्‍वर येल्ले, डॉ.रूस्तम येडे, चंद्ररेषा कांबळे, रवींद्र चन्ने, निमावती धप्पाडे, मलेशाम येरोला, मुख्याधिकारी हर्षला राणे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या भाषणात गोरेगाव नगर पंचायतच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता होऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले. सोबतच सर्व रखडलेल्या कामांना मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी नगर पंचायतव्दारे सुरू असलेले व भविष्यातील प्रस्तावित कामाविषी माहिती दिली.
यात अग्निशमनचे वाहन मुख्य मार्गावरील एलईडी लाईट, प्रधानमंत्री आवास योजना, शहरात एकूण अकरा ठिकाणी आरओ फिल्टर, स्वच्छ गोरेगाव उपक्रम, ग्रीन जीम, वॉकिंग स्ट्रिट आदी कामांचा समावेश आहे. तसेच यावेळी प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजनेतंर्गत शहरातील दहा लोकांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. येथील अरुण चन्ने यांनी एमपीएससी परीक्षेत ओबीसी प्रवगार्तून राज्यातून प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गोरेगाव नगर पंचायतीचे कर्मचारी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.