महसुल कर्मचाèयानी दिले प्रलबिंत मागण्या निकाली काढण्यासाठी निवेदन

0
8
गोंदिया,दि.27-गोंदिया जिल्ह्यातील महसुल विभागात कार्यरत असलेल्या महसुल कर्मचाèयांच्या विविध मागण्यासांठी सातत्याने शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.परंतु अद्यापही त्या मागण्या निकाली न निघाल्याने (दि.25)ला पुन्हा महसुल कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदन सादर करुन प्रलबिंत मागण्या त्वरीत निकाली काढण्याचे विनंती केली आहे.नागपूर-अमरावती पुरवठा विभागातील लिपीक,टंकलेखक,पुरवठा निरिक्षक,अव्वल कारकून पदाची सरळसेवा भरती करण्यात येत आहे.परंतु भरती प्रकिया राबवितांना सदर विभागातील कर्मचाèयाना सेवेच्या स्थायीकरण व पदोन्नती करण्यासाठी दुय्यम सेवा परिक्षा व अहर्ता उत्तीर्ण आवश्यक असतानाही त्या अटी लागू न करताच पदोन्नत्या देण्यात येत आहेत.त्यावर आक्षेप नोंदवित त्यांनाही परिक्षा तत्काळ प्रभावाने लागू करण्यात यावे.गोंदिया जिल्हयात ३४ अव्वल कारकूनची पदे रिक्त असून ती पदोन्नतीने भरण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले,त्यावेळी राजेश मेमन,आशिष रामटेके,राकेश डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.