विद्युत खांब हटविण्यासाठी युवक क्रांती संघटने निवेदन

0
13

सिरोंचा,,दि.28ः- येथील युवक क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार,उपकार्यकारी अभियंता (महावितरण कार्यालय.), नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना निवेदन सादर करुन सिरोंचा नगराच्या शहरीकरणाला बाधा ठरणार्या विद्युत खांबाना हटविण्यासंबधीचे निवेदन सादर करण्यात आले.शहरातील वळणावर, महाराष्ट्र-तेलंगणा मार्गावर सिरोंचा शहरात वाहतूक वाढल्याने या वळणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नगरम वळणावर महावितरण कंपनीचे विद्यूत खांब अगदी वळणाच्या मदोमद असल्यामुळे वाहतुकीस वाहनदारकांना अडचण होत असल्याने हे खांब हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.उपकार्यकारी अभियंता यांनी नगर पंचायत कार्यालयाकडून विद्युत खांब हटविण्याबाबत पत्र प्राप्त झाल्यास त्वरित विद्युत खांब हटविण्याचे आश्वासन उपस्थित संघटनेचे सदस्यांना दिली यावर संघटनेच्या सदस्यांनी सिरोंचा नगर पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षांची भेट घेऊन नगर पंचायत मार्फत महावितरण कार्यालयास पत्रव्यवहार करून नगरम वळणावरील विद्युत खांब त्वरित हटविण्याबाबत पत्र देण्याची विनंती केली.  निवेदनात सिरोंचा नगरम असअरली चौकातील रस्त्यावरील तिन्ही बाजूला वाहन गतीरोधक बनविन्याची विनंती केली असता नगर पंचायत मार्फत  गतिरोधक बनविणार असल्याची माहिती नगर अध्यक्ष सौ. मरीयम पेद्दपोल व उपाध्यक्ष राजू पेद्दापली यांनी युवक क्रांती संघटनेच्या सदस्यांना दिली.