पिंडकेपार येथे वृक्षारोपनाला सुरुवात

0
21

गोरेगाव,दि.2:- शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड लक्षांकपुर्तीकरीता वनविभाग, विविध संघटनाच्या सहकार्याने १ जुलै रोज रविवारला पिंडकेपार येथे विविध जातीचे ८०० झाडांच्या जातीचे वूक्षलागवड करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी गाव कामगार पोलीस पाटील राज्याचे कार्याध्यध भूंगराज परशुरामकर होते. प्रमुख मार्गदर्शक वनपरिक्षेत्राधीकारी एस एम जाधव,दिलीप मेश्राम, क्षेत्रसहाय्यक आर एस भगत,पं स सदस्य केवलराम बघेले, नंदा ठाकरे,अनिता लंजे, डिलेश्वरी पारधी,दिलीप चव्हाण, भरत घासले, डिलेश्वर पंधराम, व्ही एस भलावी उपस्थित होते.या प्रसंगी तिल्ली मोहगाव येथील शेतकरी एन जी बोपचे यांचा मुलगा नामदेव बोपचे यांच्या स्मृतीत पिंडकेपार येथे वूक्षलागवड कार्यक्रमात हजर झाले असता जांभुळ या जातीचे झाड देवुन वनपरिक्षेत्राधीकारी व विविध संघटनेव्दारे सत्कार करण्यात आले.
या वृक्षलागवड कार्यक्रमात पिंडकेपार येथील बिट क्रमांक ४६२ मध्ये ८०० झाडे लावण्यात आली. तसेच गावक-यांनी ५० झाडांचे सवर्धन करण्याची जवाबदारी घेतली.संचालन दिलीप मेश्राम यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम बी पटेल कूषी महाविद्यालयचे विद्यार्थी, गाव कामगार पोलीस पाटील संघटना,वन कर्मचारी, वन व्यवस्थापन समिती, गोरेगाव तालुका पत्रकार संघटना, मराठी पत्रकार संघ, गुरुदेव सेवा मंडळ, विकास हायस्कुल, वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार यांनी सहकार्य केले