सौंदडच्या रेल्वेटोली परिसरात हरितसेनेच्यावतीने वृक्षारोपण

0
11

स़डक अर्जुनी,दि.02ः-13 कोटी वृक्षारोपन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सौन्दड़ येथील रेल्वेटोली परिसरातील हनुमान मंदिरात हरितसेना व नागरिकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हरित सेना सदस्य डाँ.अश्विनी अशोक लंजे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला माजी सभापती अशोक लंजे,तंटामुक्त समिती अध्यक्ष चरणदास शाहारे, सौ.रंनजुताई भोई, अश्विनीताई मेंढे,टीकाराम चुटे, नरेंद्र बडोले, ओमप्रकाश बडोले, विनायक मटाले, संजय बनकर, माधवराव चचाने, देवांगना ठाकरे, कुंजीलाल जनबंधु, बाबुदान सूर्यवंशी, कैलाश कोठे उपस्थित होते.अश्विनी लंजे यांनी नागरिकांना वृक्षारोपण लागवडीच्या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण संतुलन राखण्याचे आवाहन केले.