सिलापूर येथे २२ जणांना ग्रस्ट्रोची लागण

0
16

देवरी(नंदुप्रसाद शर्मा),दि.०२ः- देवरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या सिलापूर येथे २२ जणांना ग्रस्टोची लागण झाली असून त्यांच्यावर देवरी गा्रमीण रुग्णालय व गावात वैद्यकीय शिबिर लावून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सिलापूर गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता गेल्या १५ दिवसापासून तपासण्यात न आल्याने व गावात अस्वच्छतेचे वातावरण असल्यामुळे विहिरीतील पाणी दुषीत झाले.या दुषित पाण्याचे सेवन केल्याने राहुल qजदाखोर,जिवन qजदाखोर,कुसुम qजदाखोर,प्रमेलाल qजदाखोर,वच्छला qजदाखोर,गणेश qजदाखोर,रशिका राऊत,परसराम फुंडे,नितेश्वरी चाकाटे,कौशल्या चाकाटे,साधू चाकाटे,शशिकला qजदाखोर,हंसराज फुंडे,जमूना भोयर,शिला भोयर,संयतबाई वघारे,रमेश qजदाखोर,कुंता सोनावने,दामिनी फुंडे,सरस्वता फुंडे,सुषमा खांडवाये आदींना ग्रस्टोची लागण झाली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यानी शिलापूरला भेट देऊन पाहणी केली असून वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पटले,डॉ.सुनिल येरणे,डॉ.नरडुले,आरोग्य सेवक मुनेश्वर मोहबे,हरिश दोनोडे,होमेंद्र भरणे,किरण टेभरे,नम्रता मंगले,शारदा शहारे आदी आरोग्य सेवक व सेविकांनी शिबिरस्थळी तळ ठोकले आहे.