रुग्णालय परिसरातील नाल्यांच्या स्वच्छतेअभावी शिरले पाणी

0
25
गोंदिया,दि.७ः-गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात काल गुरुवारला आलेल्या मुसळधारपावसामुळे रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच ताराबंळ उडाली.त्यातच प्रशासनाची सुध्दा पोलखोल झाली.स्वच्छतेचा यादीत आपले नाव आल्याच्या गवगवा करणाèया नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोलच या पावसाने केली.शहरातील नाल्यांची सफाई करण्यात आल्याचा गवगवा करणाèया नगरपरिषदेच्या या अभियानाची पोलखोल बाई गंगाबाई रुग्णालय परिसरात असलेल्या नाल्यांनी केली.या नाल्यामध्ये प्लास्टिक,पाण्याच्या बाटल्यासंह अनेक साहित्य तुंबल्याने नाल्यातून पाणी वाहते होऊ शकले नाही.आणि ते पाणी सरळ रुग्णालय परिसरात शिरले.रुग्णालय परिसरात असलेल्या छोट्या नाल्यांचीही व्यवस्थित सफाई होत नसल्याने त्याठिकाणी रुग्णांच्या नातेवार्इंकाच्यावतीने फेकण्यात येत असलेले शिळे अन्नपदार्थ सुध्दा पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून आले.
बीजीडब्ल्यू रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत अधिकाºयांना फटकारल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. बीजीडब्ल्यू रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत अधिकाºयांना फटकारल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश असलेली एक समिती गठीत केली. या समितीने शुक्रवारी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट देऊन इमारतीेची व परिसराची पाहणी केली.
गुरुवारच्या सायकांळी ६ वाजे सुरु झालेल्या मुसळधार पावसाने रात्री ९ वाजेपर्यंत चांगलाच कहर माजविला होता.चौफेर आलेल्या पावसामुळे बाई गंगाबाई रुग्णालय परिसरात सुध्दा २ फुटाच्यावर पाणी शिरले.परिसर पुर्णत जलमय झाले होते.रुग्णांच्या नातेवाईकांनी पाणी शिरल्याचे फोटो सोशल मिडियात व्हायरल केल्यानंतरही रुग्णालय प्रशासन व स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचे कुणीही तत्काळ गेले नाही.त्याचपरिसरात असलेल्या नगरसेवकासंह नगराध्यक्षांनाही वेळ मिळाला नाही.वास्तविक बाईगंगाबाई रुग्णालयाचे ग्राऊंडलेवल आणि वार्डापेक्षा उंच असल्याने सर्व पाणी वार्डात शिरते.त्यातच नाल्यांची सफाईही झालेली नव्हती.
काही सामाजिक संस्थाच्या कार्यकत्र्यांनी रात्रीच रुग्णालयाकडे धाव घेत रुग्णालयातील वार्डात शिरलेले पाणी काढण्याची मोहीम हाती घेतली.काही सामाजिक कार्यकर्ते,रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयात त्यावेळी हजर असलेल्या महिला कर्मचारी यांनी सर्वांच्या सोबतीने वार्डातील पाणी बाहेर काढून रुग्णांना व लहानमुलांना दुषीत पाण्यामुळे संक्रमण होऊ नये यासाठी लगेच त्यांची व्यवस्था करण्यास सुरवात केली.याकार्यात नगरसेवक लोकेश यादव,सामाजिक कार्यकर्ते भरत क्षत्रिय,योगेश अग्रवाल,कुशल अग्रवाल,रवि दखने,सुनिल भोगाडे,कैलाश भेलावे आदींनी या कार्यात सहकार्य केले.
सामाजिक कार्यकत्र्यांनी नोंदवली शहर पोलीसात तक्रार
गंगाबाई महिला रुग्णालयात गुरुवारला आलेल्या मुसळधारपावसामुळे जी अव्यवस्था निर्माण झाली.आणि त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जो त्रास सहन करावा लागला त्याप्रकरणाला घेऊन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याविरुध्द गोंदियातील सामाजिक कार्यकत्र्यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली आहे.तक्रार नोंदविणाèयामध्ये रवीकुमार दखणे,कैलास भेलावे,सुनिल भोंगाडे,मनोज मेंढे,रवि भांडारकर,विनय दलाल यांचा समावेश आहे.
बांधकाम विभागाने केले पत्राकडे दुर्लक्ष
बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सायास केंद्रे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बांधकाम विभागाला वार्डाचे ग्राऊंडलेवलबाबत पत्र देऊन पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुरुस्ती करण्याची मागणी केली होती असे सांगितले.परंतु त्यांच्या पत्राकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले तसेच नगरपरिषदेने नाल्यांची स्वच्छता सुध्दा केली नाही असे सांगितले.दरम्यान बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण यांना विचारणा केल्यावर असे पत्र आले नसल्याचे सांगितले.