सडक अर्जुनी ओबीसी संघर्ष कृती समितीची सभा उत्साहात

0
11

सडक अर्जुनी.दि.७ :-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची सभा पार पडली.या सभेत मुंबई येथील 7 आॅगस्टच्या राष्ट्रीय अधिवेशनात तालुक्यातील अधिकाधिक ओबीसींना नेण्याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच ओबीसींच्या मागण्यांना घेऊन कोहमरा येथे रास्तारोको आंदोलन करणे, गावा गावात समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजन करुन ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाअध्यक्ष दिनेश हुकरे यांनी उपस्थितांना माहिती दिली.ओबीसीवरील समस्यांच्या निवारणासाठी तालुका स्तरावर जनजागृती समिती गठीत करण्यात आली.या बैठकीला जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे प्रसिध्दीप्रमुख सावन डोये,कार्याध्यक्ष हरीश कोहळे, भुमेश्वर चव्हाण अध्यक्ष ओबीसी सेवा संघ,नगराध्यक्ष देवचंद तरोणे, भुमेश्वर कठाने, पंचायत समितीचे उपसभापती राजेश कठाने,  राजू हुकरे, अनिल कोरे, पत्रकार अनिल मुनेश्वर,बबलू मारवाडे, राजेश बडोले,अशोक लांजेवार, अनिल बावणे, लक्ष्मण शिवणकर, मधुसुधन दोनोडे, नामदेव लंजे, एकनाथ मेंढे, ओंकार मेंढे, लिलेश्वर रहांगडाले, उमेन्द्र टेंम्बरेसह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.