गोल्डन पिकॉक पुरस्काराने पटले सन्मानित

0
13
गोंदिया दि.७ :: दिल्ली येथे आयोजित २० व्या वर्ल्ड काँग्रेस हॉल इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट परिषदेत गोंदियातील हितेंद्र गोवर्धन पटले यांना आंतरराष्ट्रीय गोल्डन पिकॉक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड काँग्रेस ऑन इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड क्लायमेंट चेंज याचेवर परिषद आयोजित होती. या परिषदेत केंद्र शासनाच्या पर्यावरण तसेच पेट्रोलियम मंत्रालयाचे उच्चाधिकारी तसेच न्यायाधीश सहभागी होते. गोंदिया येथील हितेंद्र पटले हे मागील १८ वर्षांपासून गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे कार्यरत आहेत. सध्या गुजरात राज्यातील भरूच येथील कंपनीच्या प्रकल्पात चीफ मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पटले यांनी पर्यावरण व सुरक्षा या विषयावर उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना (ता.६) दिल्ली येथे  आयोजित परिषदेत आंतरराष्ट्रीय गोल्डन पिकॉक अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल पटले यांचे  डॉ. दिलीप चौधरी, प्रा. यादव बोपचे, महेंद्र बिसेन, शिशिर कटरे, खेमेंद्र कटरे, डॉ. संजीव रहांगडाले, जितू रहांगडाले, पिंटू रहांगडाले आदींनी अभिनंदन केले आहे.