मुख्यमंत्र्याच्या घरासमोर करणार आंदोलन

0
30

मौदा(प्रा.शैलेश रोशनखेडे),दि.१९ः- महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसापासून सुरु असलेल्या दुध आंदोलनाचा वणवा सगळीकडे पेटला असून मौदा तालुक्याचे शेतकरी नेते संजय सत्येकर यांनी आंदोलनाचा भाग म्हणून मुख्यमंत्र्याच्या घरासमोरच आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.खासदार राजू शेट्टी यानी पुकारलेल्या दुध दरवाढीसाठी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून सरकारने २३ जुर्लेपर्यंत प्रश्न सोडविला नाही तर संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात गायी,म्हशी सोबत घेऊन मुख्यमंत्री यांच्या नागपूर निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.गेल्या चार दिवसापासून हे आंदोलन राज्यात सुरु असतानाही मुख्यमंत्री व प्रशासनाने केलेले दुर्लक्ष हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचेच दाखवत असल्याचे म्हटले आहे.या आंदोलनात भगवान यादव,आशिष पाटील,राजू गूड़धे,विनोद यादव,अरविंद यादव,गजानंद डांगरे, प्रभु हटवार,शेषराव देशमुख,अंताराम श्रावनकर, रविन्द्र पुंडकर,मोरेश्वर श्रावनकर,राजेश मरदाना, मोनू यादव,विष्णु आगाशे,आंनद लिल्हारे,लक्ष्मण खंडार, सुनीता सतीकोसरे, किरणताई जगनेकर, कविताताई ढोबले, आकाश उमाळे,किशोर सहारे,संजय सोनसरे,चंद्रभान येरणे, अमोल चकोले,संबा चकोले,निलखंट भोन्दे, शेषराव सौदागर, रामा चकोले,सुभाष नवघरे आदी शेतकरी सहभागी होणार आहेत.