पोलीस बंदोबस्तात पालिकेने काढले अतिक्रमण

0
10

तिरोडा,दि.२४: नगरपरिषद हद्दीतील स्टेशन मार्ग ते खैरलांजी मार्गाकडे जाणाèया रस्ता बांधकामात अडथळा निर्माण करणाèया एका घरकुलासह इतर तीन बांधकामांचे अतिक्रमण तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्तात सोमवारी काढण्यात आले. यात एका नामांकित शाळेची सुरक्षाभिंत, नगरपरिषदेतर्फे देण्यात आलेले घरकुल, कंपाउंड वॉल व टिनाच्या शेडचा समावेश आहे. .
तिरोडा नगरपरिषदेतर्फे स्टेशन मार्ग तिरोडावरून खैरलांजी मार्गाला मिळणाèया रस्त्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे कंत्राट एका कंत्राटदारास देण्यात आले. या रस्त्यावर काही जागी नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता बांधकामात अडथळा निर्माण होत असल्याने सोमवार, २३ जुलै रोजी तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख, नगर अभियंता संदीप सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे देवा तिवडे, अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख संजय नागपुरे, नायब तहसीलदार नागपुरे यांच्या देखरेखीत तिरोडा नगरपरिषदेच्या कर्मचाèयांद्वारे जेसीबीने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. हे अतिक्रमण काढताना होणारा विरोध लक्षात घेता तिरोडा पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या अतिक्रमणधारकांना मुस्लिम कब्रस्थानच्या कंपाउंड वॉलला लागून असलेले दोन घरे उखंडराव मोरे बी.एड. कॉलेज, गिरजाबाई कन्या शाळेची सुरक्षा भिंत, या कॉलेजसमोर असलेले अल्ताफ मेहफुज खान पठाण यांना नगरपरिषदेने मंजूर केलेल्या घरकुलाचा काही भाग व प्रा. प्रशांत खांबरे यांच्या घरासमोरील लोखंडी शेड तसेच नरेंद्र कुर्वे यांची कंपाउंड वॉल काढण्याकरिता पथक आले असता प्रशांत खांबरे व नरेंद्र कुर्वे तसेच कब्रस्थानच्या भिंतीला लागून असलेल्या घरमालकांनी आपण स्वत:हून अतिक्रमण काढतो असे सांगितले. मात्र, गिरजाबाई कन्या शाळेची सुरक्षाभिंत जेसीबीने पाडून अल्ताफ पठाण यांचे घरकुल पाडण्यास गेले असता येथे काहीसा विरोध झाला. दरम्यान या घरातील महिलांनी आपण घराच्या बाहेर निघणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. यामुळे हे पूर्ण घरकुल न पाडता समोरील काही भाग पाडण्यात आला. याबाबत अतिक्रमणकत्र्यांनी आपणास मार्च महिन्यात नगरपरिषदेतर्फे केवळ एकच नोटीस देण्यात आल्याचे सांगितले तर उखंडराव मोरे अध्यापक विद्यालयाचे हरीश मोरे यांनी आपणास नोटीसच मिळाली नसल्याचे सांगितले.या कारवाईमुळे इतरही अतिक्रमणधारकांना धडकी भरली असून तिरोडा नगरपरिषदेने इतरही अतिक्रमण काढावे, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे..