कान्द्री वनविभागाची तक्रार तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना

0
14
मोहाडी (नितिन लिल्हारे),दि.27 : कान्द्री वनविभाग मार्फत झाडे लावण्याकरिता एप्रिल- मे महिन्यात खड्डे खोदकाम करण्यात आले असून दीड बाय दीड खड्डा खोदल्यानंतर मजुरांना २०.३३ रुपये मिळणार होते मात्र येथील अधिकाऱ्यांनी मजुरांना पूर्ण पैसे दिले नसून बोगस नावे टाकून या मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे निष्पन्नात आले आहे.
रोपवनातील गैरकारभार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी मोहाडी तहसीलदार आशा कुर्वे मार्फत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य के के पंचबुद्धे, रामकला लिल्हारे, सुशीला लिल्हारे, गौरी मांढरे, शंकर गराडे, अशोक सव्वालाखे, दिनेश निमकर, जगत लिल्हारे, संकपाल दमाहे, दुरंगलाल लिल्हारे, सुरजलाल सव्वालाखे, सरादू लिल्हारे,भक्तप्रलाद मांढरे, प्रभुदास लिल्हारे उपस्थित होते.
टांकला व सालई खुर्द या गावातील जंगलात वनविभागा मार्फत प्रत्येकी १५ हेक्टर असे ३० हेक्टर जागेत ३३३३०/- एप्रिल – मे महिन्यात खड्डे खोदकाम करण्यात आले, परंतु मजुरांनी दीड बाय दीड खड्डा खोदल्यानंतर मजुरांना प्रती खड्डा २०.३३ रुपये देऊ असे अधिकाऱ्यांनी बोलले होते.मात्र अर्धेच पैसे मिळाले. मजुरांनी भर उन्हाळ्यात एका दिवशी १८ खड्डे खोदकाम केले आहे. मात्र येथील अधिकारी यांनी त्यांना प्रति खड्डा पैसे न देता अर्धे पैसे त्यांच्या खात्यावर टाकले जे मजूर अजिबात कामावर आले नाही अशा अतिरिक्त मजुरांच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैशा टाकण्यात आले. सालई खुर्द येथील कामावर १० मजूर बोगस दाखवून व टाकला येथे तुमसर, मोहाडी, खापा, हिंगणा, टाकला, वडेगावं, असे अनेक गावातील जवळपास १०० मजुरांचे बोगस नावे दाखविण्यात आले आहे. सदर कामांची मजुरी कमी मिळाल्याने व मोठ्या प्रमाणात बोगस नावे असल्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. चकोले यांना वारंवार सांगूनही टाळाटाळ करीत होते. सालई खुर्द येथील वनरक्षक गंधारे व टाकला येथील डी एफ फटींग हे काम सांभाळत होते व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. चकोले व इतर अधिकाऱ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात पैशाची अफरातफर व देवाणघेवाण करण्यात आली आहे. यांची तक्रार उपवनसंरक्षक विवेक होशिंग भंडारा यांना देण्यात आली होती मात्र चौकशी वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे. मजूर राब राब राबतो मात्र त्याच्या घामाचा पैशावर असे भ्रष्ट अधिकारी डल्ला मारत असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाही व्हायलाच पाहिजेत तरच असा घोटाळ्यांवर अंकुश बसेल.
सर्व अधिकारी एकाच माळेचे मणी आहेत तरी वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. चकोले यांच्या कडून चौकशी काडून वरिष्ठांकडे देण्यात यावी व कसून चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही व दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व मजुरांना घामाचा पैशा त्वरित देण्यात यावे अन्यथा १५ आगस्ट पासून उपोषणावर बसण्याचा ईशारा मजुरांनी दिला आहे.