चार वर्षात खोटे आश्वासनाशिवाय काही नाही-आ.अग्रवाल

0
12

गोंदिया,दि.27 : देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. सरकार युवकांना रोजगार व व्यापारात प्रगती देऊ शकली नाही. एवढेच नव्हे तर वाढती महागाई नियंत्रित करण्यातही सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जवळील ग्राम नागरा येथे जिल्हा परिषद क्षेत्रातील कॉँग्रेस कार्यकर्ता, ग्राम अध्यक्ष, पदाधिकारी, बुध कमिटी सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, नागरा जिल्हा परिषद क्षेत्र कॉंग्रेसचा गड राहिला आहे. मात्र मागील काही काळात येथील नागरिकांना फुस लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मात्र कॉग्रेस कार्यकर्ता पक्षाचा कणा असून त्यांनी नागरा क्षेत्र व अवघ्या परिसरात होत असलेले विकास कार्य सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचवून पक्षाला मजबूत करावे असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, ओमप्रकाश भक्तवर्ती, पुष्पा अटराहे, एन.सी.रहांगडाले, चेतन रहांगडाले, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, गौरीशंकर डहाट, झनक पटले, ईश्वर पटले, प्रशांत लिल्हारे, बंडू शेंडे, नलिनी सहारे, दुर्गाप्रसाद धांदे, सुरेंद्र गणवीर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.