दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा

0
27

अमरावती,दि.30 : कर्मयोगी स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण सोहळयादरम्यान अनेकांचे डोळे पाणावले. त्यांच्या करारीबाण्याचे अनेक अनुभव कथन करत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रविवारी मोर्शी मार्गावरील गुरुदेव प्रार्थना मंदिरात असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या दादासाहेबांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे ते वैशिष्ट्य ठरले.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृति प्रतिष्ठानातर्फे आयोजित हा सोहळा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, खा. आनंदराव अडसूळ, अकोल्याचे आ. रणधिर सावरकर, दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ, माजी आ. नरेशचंद्र ठाकरे, रामचंद्र शेळके, केशवराव गांवडे, केशव मेटकर, अशोक ठुसे, माजी मंत्री वसुधा देशमुख शशी खोटरे, बबनराव चौधरी उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलन व दादासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिल काळे यांच्या आदंराजली गीताने उपस्थिताना भारावून टाकले होते. मान्यवरांचे स्वागत संजय देशमुख, रविकिरण बढे, राजेंद्र तायडे, राजेंद्र कदम, अशोक साबळे, नरेश पाटील, ओंकार बंड, गजानन भारसाकळे यांनी केले.