अवयवदानासाठी एक दिवस सायकलच्या नावे

0
17

गोंदिया,दि.03 : ‘अवयवदान जीवनदान’ गरजू व्यक्तीला कुणाचे अवयव मिळाले तर त्याला एक नवीन जीवन मिळते तसेच ज्याने आपले अवयवदान केले तोही व्यक्ती आज जगात जिवंत आहे, हे पण तेवढेच खर आहे. येत्या १३ ऑगस्टला विश्व अवयवदान दिवस असल्याने १ ऑगस्ट बुधवारला गोंदिया जिल्हा पोलीस विभाग आणि जेसीआई गोंदिया राईस सिटी त्यांचे जागतिक अवयवदान दिनानिमित्त एक दिवस सायकलच्या नावे या उपक्रमाद्वारे गोंदिया येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सदर रॅली सकाळी ६ वाजता गांधी प्रतिमापासून जयस्तंभ चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्रीटाकीज रोड, गोंदिया पोस्ट ऑफिस, डब्लिंग कॉलनी, मामा चौक, काका चौक, इंगळे चौक, हनुमान मंदिर, सुभाष गार्डन येथे पूर्ण करण्यात आली. गोंदिया शहरवासीयांना अवयवदानदिनानिमित्त नागरिकांनी अवयवदान करावे यासाठी ही सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नीलिमा पाटील भुजबळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, मंजू कटरे, रवी सपाटे, संगीत घोस, पोलीस उपनिरीक्षक राधिका कोकाटे, पुरुषोतम मोदी, अंकुश डोडानी, नितीन मेश्राम, नरेंद्र बेलगे, हरिकृष्ण राव, श्रद्धा याद, पालक कातोडी, दीपक गाडेकर, निर्मल अग्रवाल, आतिश लोणारे व पोलीस विभागाचे अनेक पाढा अधिकारी आणि कर्मचारी तसेच जेसीआई गोंदिया राईस सिटीचे अनेक पदाधिकारी व सदस्यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला..