विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर आघाडीचे सर्चस्व

0
8

गडचिरोली ,दि.24ःगोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन, स्थायी व तक्रारनिवारण परिषदेची निवडणूक घेण्यात आली. विद्यापीठाच्या दृष्टीने महत्वाची समजल्या जाणार्‍या व्यवस्थापन परिषदेसाठी ४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यात तीन जागांवर आघाडी तर एक जागेवर शिक्षण मंचाने विजय मिळविला आहे. तीनही समित्यांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत ११ जांगौपकी ६ जागांवर आघाडीने विजय मिळविला आहे.
विद्यापीठाने व्यवस्थापन (मॅनेजमेंट), स्थायी व तक्रार निवारण परिषदेसाठी आज २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या सभागृहात व्यवस्थापन परिषदेसाठी ४, स्थायी समितीसाठी ४ तर तक्रार निवारण समितीसाठी ३ जागांसाठी निवडणूक मतदान घेण्यात आले. मतदान झाल्यानंतर लगेच २ वाजतानंतर मतमोजणी करण्यात आली. यात व्यवस्थापन परिषदेवर आघाडीचे प्राचार्य गटातून डॉ. राजाभाऊ मुनघाटे, व्यवस्थापन गटातून डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, पदवीधर गटातून अजय लोंढे तर शिक्षण मंचाचे पराग धनकर हे शिक्षक गटातून विजयी झाले. स्थायी समितीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिक्षण मंचाचे प्राचार्य गटातून डॉ. लालसींग खालसा, व्यवस्थापन गटातून संदीप कोषट्टीवार, शिक्षक गटातून प्रेमानंद बावनकुडे तर आघाडीचे अँड. गोविंद भंेडारकर पदवीधर गटातून विजयी झाले. तक्रार निवारण परिषदेसाठी घेण्यात आलेल्या तीन जागांसाठी शिक्षक गटातून आघाडीचे नामदेव वरभरे अविरोध, तज्ज्ञ गटातून किशोर मोहरील विजयी झाले. यात शिक्षकेत्तर गटातून शिक्षण मंचाचे हुमेश काशीवार विजयी झाले आहेत.