काँग्रेस-रॉकासह विरोधी पक्षाने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद

0
27

गोंदिया,दि.१० – पेट्रोव, डिझेल, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर, जीवनआवश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. महागाई वाढत असल्याच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात आज सर्वपक्षीय बंदची घोषणा करण्यात आली होती. गोंदियातही या बंदला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी गोंदियातील व्यापाèयांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.त्यातच जिल्ह्यात तान्हा पोळ्यानिमित्त सुट्टी असल्याने शाळा महाविद्यालय आधीच बंद होते,बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होता याचा लाभ बंददरम्यान मिळाला .गोंदिया,गोरेगाव,आमगाव,अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात दरवाढीविरोधात रॅली काढण्यात आली.ही रॅली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय रेलटोली येथून काढण्यात आली.यावेळी खासदार मधुकर कुकडे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,माजी आमदार राजेंद्र,दिलीप बनसोड,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर,विनोद हरिणखेडे,मनोहरराव चंद्रीकापुरे, राजू जैन,छोटू पटले,जितेश टेंभरे,नानू मुदलीयार,अशोक शहारे,उमेंद्र भेलावे,केतन तुरकर,कृष्णा भांडारकर,सोनू रॉय,खालीद पठाण,अशोक गुप्ता,मोहनलाल पटले,मनोहर वालदे,जि.प.सदस्य कैलास पटले,लता रहागंडाले,गणेश बरडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोटारसायकसल रॅलीत सहभागी झाले होते.मोटारसायकल रॅलीनंतर उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून दररोज डिझेल, पेटड्ढोल आणि गॅसचे भाव वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इंधनाचे दर कमी झाले पाहिजे, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला गोंदियात उत्तम प्रतिसाद मिळला.गोंदियामध्ये आज सकाळपासूनच प्रतिसाद मिळत आहे. तसेच गोंदियातील मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद असल्याचे दिसत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्यावतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महागाईमुळे सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच पेटड्ढोलच्या दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आज पेटड्ढोलचे प्रति लिटर दर ८९. ९७ असून, डिझेलचे दर ७७. १९ रुपये झाले आहे. पेटड्ढोलमध्ये आज २२ पैशांनी वाढ तर डिझेलमध्ये २३ पैशांची वाढ झाली आहे. या बंदला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रे,भारतीय काँग्रेस,युवक काँग्रे,भाकप,माकप, काँग्रेस वाहतुक संघ, जिल्हा परमीट संघटना, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा परमीट ऑटो संघटना, विदर्भ ऑटो चालक, टॅक्सी चालक-मालक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
मागील चार वर्षांपासून भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस पेटड्ढोल डिझेल व इतर जीवनाश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. याच्या विरोधात आज भारत बंदची हाक दिली होती.गोंदिया तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, योगराज उपराडे, मुनेंद्र नांदगाये, संजू लिल्हारे, अरूण ठाकरे, देवराम बर्वे, अरूण ठाकरे, महेंद्र आंबाडारे, लालजी कोठेवार, सुनील कटरे, संजय ठाकरे, बाबुलाल रहांगडाले, निर्माण ढेकवार, सहारे, अशोक लिचडे, संजय बडोले, जीवन चव्हाण, कृष्णा रहांगडाले, आशिष टेंभरे, जयचंद पारधी, बाबुलाल उपराडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
गोरेगांव -येथेही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. गोरेगांव बस स्टैंड चौकापासून रॅली काढण्यात आली.या रॅलीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले,चरणदास भावे,परेश दुर्गवार, गुणवंतराव नाईक, योगेश वडगाये, कल्पना डोंगरे, दुलीचंद कावड़े,भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिग बघेले,माजी सभापती पी.जी.कटरे,जगदीश येरोला,तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले,जितेंद्र कटरे, विशाल शेंडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे महेंद्र चौधरी,डॉ.रुस्तम येडे, लक्ष्मणराव चंद्रिकापूरे सहभागी झाले होते.गोरेगांवातील सर्व दुकाने बंद राहिली.मागण्याचे निवेदन पोलीस उपनिरिक्षक थोरात यांना देण्यात आले.
सडक अर्जुनी- येथील पेट्रोलंपपावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते,पदाधिकारी डॉ.अविनाश काशिवार,शेषराव गिर्हेपुंजे,राजेश नंदगवली,देवचंद तरोने,अशोक लंजे,रामलाल राउत,रमेश चुर्र्र्र्हे,राजू पटले,आनंद अग्रवाल,प्रभूदयाल लोहिया,सौ. छायाताई चव्हाण,सौ. रजनी गिर्हेपुंजे,सौ. गायत्री इरले,सौ.शशिकला टेंभुर्णे,सौ.मंजुताई डोंगरवार,सौ.वंदना डोंगरवार,सौ. दुर्गा खोटेले,दिनेश कोरे,आशीष येरणे,आकाश गुप्ता,दुष्यांत चव्हाण,शेरू पठान,शंकर डोंगरवार,डॉ.बबन कांबले,नानू निम्बेकर,नासिर शेख, मधुकर दोनोडे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अर्जुनी मोरगाव -येथेही बंददरम्यान धरणे आंदोलन करुन महागाईच्या विरोधात निदर्शेने करण्यात आली.मागण्याचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे नायब तहसिलदार गेडाम यांना देण्यात आले.आंदोलनात भागवत नाकाडे,किशोर शहारे,रत्नदिप दहिवले,अजय पशीने,चंद्रशेखर ठवरे,मनोहर शहारे,राकेश लंजे,उध्दव मेहंदळे,गिरीष पालीवाल,इंद्रदास झिलपे,माणिक घनाडे,आंनद जांभुळकर,राजू पालीवाल,बंडू भेंडारकर,रqवद्र खोटेले,प्रज्ञा गणवीर,शिला उईके,सुभाष देशमुख,चेतन शेंडे,नामदेव डोंगरवार,नितिन धोटे,सोमेश्वर सौंदरकर,वेद राठोड आदी कार्यकर्ते मोठय संख्येने सहभागी झाले होते.
देवरी- येथे अखिल भारतीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून बाजारपेठ बंद केल्यानंतर तहसिल कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सदस्य सहसराम कोरेटी,अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी संदिप भाटिया,बाजार समिती सभापती रमेश ताराम,ओमप्रकाश रामटेके,गोपाल तीवारी, महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे,माजी नगराध्यक्ष सुमनताई बिसेन,सी.के.बिसेन,रायुकाँचे युगेशकुमार बिसेन व राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.