वृत्तपत्र विक्रेत्यांचे 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन

0
8

कल्याणकारी मंडळाचे कामकाज गतीने सुरू करण्यासाठी
गोंदिया,दि.13ः- राज्यातील वृत्तप़त्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे षासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवार 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांना निवेेदन देवून राज्य वृत्तप़त्र विक्रेता संघटनेने जाहीर केला आहे.
नागपूर येथे 16 जुलै 2018 रोजी राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी कामगारमंत्रयांनी 15 आॅगस्ट पासून नोंदणी सुरू करणार असल्याचे सांगितले होते. पण आजपर्यंत कल्याणकारी मंडळाच्या कामाला सुरूवात झालेली नाही.तेव्हा 15 सप्टेंबर पर्यंत नोंदणी सुरू करून कल्याणकारी मंडळाचे कामकाज तत्काळ सुरू करावे अन्यथा 25 सप्टेंबर 2018 रोजी मुंबईसह राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलकार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा
इषारा महाराष्ट राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने  दिला आहे. असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विकेत्यांची नोंदणी तत्काळ सुरू करा,मंडळाच्या कामकाजासाठी आवष्यक त्या प्रषासकीय सेवा सुविधा देउन मंडळ कार्यान्वित करावे, असंघटित कामगार वृत्तप़त्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव व आर्थीक तरतूद करावी,महाराष्ट राज्य असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तप़त्र विक्रेत्यासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन कराव,मोक्याच्या ठिकाणी स्टाॅलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी,अस्तित्वात
असलेले स्टाॅल अतिक्रमणात धरू नये,षासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात या मागण्यांसाठी हे आदंोलन होणार आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणा-या धरणे आंदोलनात वृत्तपत्र विके्रत्यांनी मोठया संख्येने सहभागी होवून आपली एकी राज्य शासनाला दाखवून द्यावी,हे आंदोलन वृत्तपत्र विकेेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. तरी राज्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांनी केले आहे. तेव्हा आपल्या जिल्हा व तालुका ठिकाणाहून वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी मंगळवार 25 सप्टेंबर 2018 रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रमोद भोयर, दिनेष उके, राजेष
वैद्य,दुर्गाप्रसाद अग्रहरी, राजेश साठवणे,तसेच सर्व तालुकाध्यक्ष पदाधिका-यांनी केले आहे.