बावनथडी धरणाच्या पाण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन

0
9
नितीन लिल्हारे/मोहाडी,दि.18ः-: पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने जिल्ह्यात धानाचे पीक धोक्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नसल्याने उभे धानपीक वाळत आहे, त्याकरिता बावनथडी धरणाच्या पाण्याची लेव्हल वाढवून शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणी करीता सालई खुर्द येथे रामटेक ते तुमसर रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
बावनथडी प्रकल्पातून शेतीला पाणी मिळावे, यासाठी दिमांड भरूनही पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नाही या भागातील धानपीक वाळत आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे, बावनथडी प्रकल्पाचे पाणी १५ सप्टेंबर ला सकाळी सोडूनही बावनथडी वरून २५ कि. मी. अंतरावर असलेल्या सालई खुर्द परिसरात चार दिवस व चार रात्र लागतात का? हे तर बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी शेतकऱ्यांवर घोर अन्याय करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, वेळेवर पाण्याची सुविधा करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दि. १८ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी रामटेक-तुमसर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलन दरम्यान पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपला ताबा घेऊन उपस्थित होते, त्यादरम्यान बावनथडी प्रकल्पाचे अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून, उपविभागीय अधिकारी वाघमुडे साहेब, सहाय्यक अभियंता नागपुरे, सहायक अभियंता भांडारकर, इतर अधिकारी यांच्याशी घडना स्थळी चर्चा करून त्वरित शेतकऱ्यांच्या समक्ष पाण्याची लेव्हल वाढवून व सालई खुर्द पर्यत पाणी येई पर्यंत आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. अखेर शेतकऱ्यांना पाणी दिसून आले आणि रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासन व शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. यावेळी शेतकाऱ्याबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका केली.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता नितीन लिल्हारे, उपसरपंच प्यारेलाल दमाहे, उपसभापती उमेश पाटील, अशोक पटले, श्रीकांत बन्सोड, किशोर भैरम, सरपंच महेश पटले, सरपंच राजेश मते, अमरकंठ सव्वालाखे, नंदलाल लिल्हारे,सरपंच गिरीपुंजे, भोला पारधी, रामू बघेले, महेश पराते,आनंद खोब्रागडे, प्रकाश खराबे, शिवदास लिल्हारे, रवि पटले, झनक दमाहे, यशवंत आटराहे, राजू सव्वालाखे, ठेकल ठाकरे,कालु दमाहे, देवानंद ठाकरे,राजेश दमाहे,प्रवीण लिल्हारे, ईश्वर लिल्हारे, राजेश भगत, पुरुषोत्तम तुरकर, राजेंद्र सव्वालाखे, गुलाब रहांडाले, रवी ढगे, बालचंद दमाहे, छानदेव ठाकरे,किशन दमाहे, राजू गोंड, योगेश्वर नागपुरे, व इतर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.