जनजागृती कार्यक्रमात महामानवांच्या स्मृतीना उजाऴा

0
13

गोंदिया,दि.18:- स्थानिक पाटलीपुत्र बुद्ध विहार, गोविंदपुर गोंदिया येथे थोर समाज सुधारक, स्वाभिमानी आंदोलनाचे प्रणेते पेरियार रामास्वामी नायकर जयंती, बौद्ध धम्माचे प्रचारक बोधिसत्व अनागरिक धम्मपाल जयंती, तसेच सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर स्मृतिदिना निमित्त संविधान बचाव कृती संघ गोंदिया जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा गोंदिया शहर, पाटलीपुत्र बुद्ध विहार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “अभिवादन कार्यक्रम” पार पडले. याप्रसंगी संविधान बचाव कृती संघातर्फे संयोजक अतुल सतदेवे, राजेश मेश्राम , कु. चेतना रामटेककर, संभाजी ब्रिगेड- मराठा सेवा संघाचे दीपक बहेकार, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, भारतीय बौद्ध महासभातर्फे पौर्णिमा नागदेवे, NNBYचे विश्वजीत बागडे, परिसरातील मान्यवर हेमराज डोंगरे, इंद्रजीत भीमटे आदि अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
फ़क्त जयंती/स्मृतीदिवस पुरते महामानवांना स्मरण करुन चालणार नाही तर महामानवानी सांगितलेल्या विचारधारेवर चालून समता स्वतंत्रता, बंधुता, न्यायावर आधारित समाजाची निर्मिती संभव आहे”. तसेच “बहुजन समाजात जन्मलेल्या समस्त महामानवांच्या विचारधारेची गुरुकिल्ली म्हणजे भारतीय संविधान आहे.या सविधानांचा बचाव करणे आम्हा प्रत्येकांची जवाबदारी आहे, ऎसे प्रतिपादन मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना केले.यशस्वीतेकरिता पाटलीपुत्र बुद्ध विहार महिला मंडळच्या बबिताताई भालाधरे, मायाताई मेश्राम, गौतमाताई चिचखेड़े, लक्ष्मीताई मेश्राम, हस्तकलाताई फुले, पंचशीलाताई मेश्राम, कल्पनाताई भीमटे, पुष्पाताई मेश्राम, आदिनी सहकार्य केले.