स्वच्छता मोहिमेला लोकसहभागाचे रुप द्या-सभापती लता दोनोडे

0
10

सालेकसा,दि.१९ः-स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते.गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबवून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेली स्वच्छता ही सेवा जनजागृती अभियान लोकचळवळीच्या रूपात राबविण्याचे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती लताताई दोनोडे यांनी केले.त्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पं.स.सालेकसाच्या वतीने आयोजित स्वच्छता ही सेवा अभियानाच्या तालुकास्तरीय शुभारंभ व कार्यशाळेप्रसंगी बोलत होते.

कार्यशाळेला पंचायत समिती सभापती अर्चनाताई राऊत,उपसभापती दिलीप वाघमारे,जि.प.सदस्य विजय टेकाम, जि.प.सदस्य प्रतीभाताई परीहार, पं.स.सदस्य जयाताई डोये, प्रमीलाताई दशरीया,भरतभाऊ लिल्हारे, गट विकास अधिकारी एस.एन.वाघाये, गट शिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे, प्रशासन अधिकारी एस.जी. पवार ,सहा.प्रशासन अधिकारी मनोज पटले यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी,सरपंच, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. गट विकास अधिकारी एस.एन.वाघाये यांनी, स्वच्छता ही सेवा अभियानाचा उदेश्य सांगून ग्रामस्तरावर या कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी याकरीता सरपंच व ग्रामसेवकानी पुढाकार घ्यावा.जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवावे असे आवाहन केले. यावेळी पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांना स्वच्छता ही सेवेची शपथ देवून स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन एस.एस.निमजे विस्तार अधिकारी यानी केले. व आभार समूह समन्वयक महेश वाढई यांनी मानले.यशस्वितेसाठी  गांधी पटले,शोभा डोये यांनी सहकार्य केले आहे.