महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांचा वाशिम जिल्हा दौरा

0
16

वाशिम, दि. २१ : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे हे शनिवार, दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.खा. धोत्रे हे दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मोटारीने अकोला येथून शेलूबाजारकडे प्रयाण करतील. सकाळी ८.४५ ते ९.३० वा. दरम्यान शेलूबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित कार्यक्रमास, सकाळी १० ते ११ वा. किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कार्यक्रम, सकाळी ११.४५ ते दु. १२.३० वा. दरम्यान आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रम, दुपारी १ ते २ वा. दरम्यान शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणाऱ्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी ३ ते ४ वा. वाशिम शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी ५ ते ६ वाजता केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणाऱ्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील व त्यानंतर अकोलाकडे प्रयाण करतील.