संस्थेच्या प्रगतीकरीता जनतेचा विश्वास घट्ट निर्माण करा:-खा. प्रफुल्ल पटेल

0
14

तूमसर,दि.24 :- ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी जनतेचा विश्वास  येथिल संचालक मंडळाने ग्रहन केला असला तरी तो विश्वास आणखी कसा संस्थेविषयी घट्ट करता येईल याकडे लक्ष केंद्रीत करून संस्थेच्या प्रगतीकरीता जनतेचा विश्वास कायमस्वरुपी घट्ट करा, तरच समाधान पतसंस्था आर्थिक शिखराकडे वाटचाल करील असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तुमसर तालुक्यातील खापा येथिल समाधान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नविन ईमारतीच्या लोकार्पण सोहऴ्याप्रसंगी (दि.२३) केले.
मंचावर अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी शेतमजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबूध्दे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फूंडे, जिल्हा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सार्वे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनजंय दलाल, जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, देशोन्नतीचे शाखा व्यवस्थापक चेतन भैरम, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, माजी आमदार अनिल बावणकर,जि प सभापती धनेंद्र तूरकर, रेखा ठाकरे, जि प सदस्या गिता माटे, कल्याणी भूरे, संस्थेचे उपाध्यक्ष अनंतलाल दमाहे,संचालक जैराम तूमसरे, मोतीलाल पूंडे, देवानंद गोमासे, विनोद बोरकर, उदेलाल दमाहे,कौतुका सार्वे, निशा भोयर, व्यवस्थापक विलास तिजारे, आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी नाना पटोले यांनी कर्जमाफी, इंधन दरवाढ, महागाई, व राफेल लढाकु विमान घोटाळ्यारून केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरत सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. त्यावेळी खासदार मधुकर कुकडे सह अनेक मान्यवरांचे भाषणे झाली.पतसंस्थे कडून नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या खातेदाराचा व सभासदांचा व शालेय नाविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी जि प उपाध्यक्ष रमेश पारधी, राजू कारेमोरे ,सिमा भूरे, वासूदेव बांते, शंकर राऊत,किरण अतकरी,  गजानन झंझाड, राजेश हटवार,हिरालाल नागपूरे, मालीनी वहीले, सूजाता कनपटे, सरपंच योगेश हलमारे,  सभासद, अभिकर्ता,कर्मचारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोपाल ठवकर यानी केले.संचालन संचालक बालकदास ठवकर यांनी तर उपस्थितींचे आभार संस्थेचे सचिव विठ्ठलराव कहालकर यांनी मानले.