ओबीसी संघर्ष समितीच्या गोरेगाव तालुकाध्यक्षपदी गुड्डू कटरे तर सालेकसा अध्यक्षपदी मनोज डोये

0
11

गोरेगाव,दि.26: गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने येथील पार्वती व्होकेशनल टड्ढेनिंग इंस्टिट्युट येथे घेण्यात आलेल्या गोरेगाव तालुकास्तरीय सभेमध्ये गोरेगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्षपदी उमेंद्र(गुड्डू) कटरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.तर तालुका महासचिवपदावर बबईचे सरपंच सोमेश रहागंडाले व जिल्हा सचिवपदावर चांगोटोला निवासी चौकलाल येडे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते.प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा महासचिव शिशिर कटरे,ओबीसी सेवा संघाचे तालुका प्रमुख प्रा.संजीव रहागंडाले उपस्थित होते.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कार्याची माहिती आणि भविष्यात राबविण्यात येणाèया कार्यक्रमासह ओबीसीवर सातत्यांने कशापध्दतीने अन्याय करण्यात आले याबाबत माहिती देण्यात आली.
या बैठकित गोरेगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली.त्यामध्ये गोरेगाव तालुक्यातून जिल्हा सचिव म्हणून चौकलाल येळे, गोरेगाव तालुकाध्यक्ष उमेंद्र कटरे, कार्याध्यक्ष भिमराज चौरागडे, महासचिव सोमेश रहागंडाले, कोषाध्यक्ष गजानन बिजेवार, उपाध्यक्षपदी माधव फुंडे, खेमराज पाथोडे, सहसचिव विलास बहेकार, डॉ. योगेशकुमार हरिणखेडे, गोरेगाव तालुका ओबीसी विद्यार्थी अध्यक्ष कमलेश बारेवार, तालुका ओबीसी कर्मचारी आघाडी अध्यक्ष हर्षल अंबुले व भुमेश्वर राणे, शहर महासचिव सुधीर कटरे, प्रसध्दीप्रमुख भागचंद रहागंडाले, डिलेश्वर पंधराम, यासिन शेख आदींचा समावेश करण्यात आला.
सालेकसा ओबीसी कृती संघर्ष अध्यक्षपदी मनोज डोये
सालेकसा: ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सालेकसा येथे पार पडलेल्या बैठकीत सालेकसा तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीच्या अध्यक्ष पदी मनोज डोये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हाध्यक्ष बबलूजी कटरे होते. यावेळी जिल्हा ऊपाध्यक्ष लक्ष्मण नागपुरे ,जिल्हा महासचिव मनोज मेंढे ,जिल्हा सचिव मोहन वडदकर , जिल्हा सुरक्षा प्रमुख विजय फुन्डे उपस्थित होते. या बैठकीत कार्याध्यक्ष पदी युवराज नारायणभाऊ कटरे, उपाध्यक्ष गोपीचंद रघुनाथजी शिवनकर, तालुका महिला अध्यक्षपदीअनिता सुरेशजी चुटे, नगर पचांयत महिला शहर अध्यक्ष सौ .वंदना सुरेन्द्र डोये, तालुका विद्यार्थी अध्यक्षपदी राहुल वासुदेव हटवार, तालुका विद्यार्थी ऊपाध्यक्ष योगेश पटले, तालका विद्यार्थी महामंत्री रविन्द्र सुरेश चुटे, तालुका मिडीया प्रमुख मधुकर हरिनखेडे व सोशल मिडीया समन्वयकपदी निलेश बोहरे, प्रमुख मार्गदर्शक गुणवंत(मुन्ना)बळीराम बिसेन, तालुका प्रसिद्घ प्रमुख राजु धनराज फुन्डे, प्रकाश टेभंरे, पवन पाथोडे, यशंवत शेण्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.