रुची एग्रोच्या यौगिक शेतीची पाहणी करणार डॉ.आत्मप्रकाश

0
16

गोंदिया,दि.२६ः-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १९७३ च्या तुकडीतील एमएस्सी कृषी(माती) अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावणारे आणि माऊंट आबू येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या यौगिक शेती विषयाचे मार्गदर्शक प्रा.डॉ.बी.के.आत्मप्रकाश यांचे गोंदियात २३ वर्षानंतर आगमन झाले आहे.उद्या गुरुवारला ते अत्याधुनिक साहित्यांचा वापर करुन शेतीच्या क्षेत्रात एक वेगळेस्थान मिळविणाèया रुची एग्रो गृपच्या रायपूर येथील एग्रो फार्मला सकाळी ६ वाजता भेट देऊन त्याठिकाणी राबविण्यात येत असलेल्या यौगिक शेती,सेंद्रिय शेतीसह उत्पादित होणाèया ड्रगनफुडसह इतर पिकांची पाहणी करणार असल्याची माहिती रुची एग्रो फार्मचे संचालक भालचंद्र ठाकूर,महेंद्र ठाकूर यांनी दिली.