सेवानिवृत्ती नंतरही कर्मचाèयांच्या आर्थिक समस्या सोडविणार : बांगरे

0
11
 बहुउद्देशीय कर्मचारी पत संस्थेची सभा उत्साहात
गोंदिया,दि. २६ : सेवा निवृत्तीनंतर कर्मचाèयांना अनेक आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते, यातून मार्ग काढत आपल्या बहुउद्देशीय कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या माध्यमातून सभासद कर्मचाèयांच्या आर्थिक समस्या सेवानिवृत्तीनंतर सुध्दा सोडविण्यात येतील तर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे सभासदत्व रद्द होणार नाही असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद बहुद्देशीय कर्मचारी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष नुतन बांगरे यांनी केले.
येथील संस्थेच्या सभागृहात २० सप्टेंबर रोजी आयोजीत पहिली वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  यावेळी संस्थेचे शिक्षक सहकारी पत संस्थेचे अधयक्ष विरेंद्र कटरे, बहुउद्देशीय कर्मचारी संस्थेचे संचालक मनोज नेवारे, अरqवद नाकाडे, वाय. एस. भगत, दिनेश बोरकर, उषा आगाशे, वाय. एस. मुंगलमारे, मो. अयूब खान, अनिरूध्द मेश्राम, जिप शासकीय कर्मचारी ग्राहक संस्थेचे माजी व्यवस्थापक वाय. एस. नंदनवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, बांगरे यांनी सभासद कर्मचाèयांच्या हिताचे अनेक निर्णय जाहिर करून सभासदांच्या विविध शंकांचे समाधान केले. प्रसंगी सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पीत करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाèयांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर नुतन बांगरे यांनी संस्थेचे आजीवन सदस्य स्विकारले. यावेळी संस्थेचे सर्व सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन संचालक विनोद लिचडे यांनी केले.