आजच्या केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्टच्या बंददरम्यान नागरिकांनी औषधासाठी संपर्क साधावा

0
9

वाशिम, दि.28 : ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट यांनी प्रस्तावित पोर्टलवर नोंद करुन औषध खरेदीविक्री करावी या प्रस्तावाच्या   विरोधात 28सप्टेंबर रोजी सर्व रिटेल  होलसेल औषध विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसे प्रशासनाला या संघटनेने कळविले आहेतथापी तातडीच्या परिस्थीतीत रुग्णांना औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाबाबत जिल्हा प्रशासनजिल्हा पोलीस प्रशासनइंडियन मेडिकलअसोसिएशननॅश्नल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांना माहिती देण्यात आली असून वैद्यकीय व्यवसायीकांनी एक दिवस पुरेल ऐवढा औषध साठा त्यांच्याकडे उपलब्धकरण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

      प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रेजेनेरिक मेडिकल स्टोअर्सहॉस्पीटलशी संलग्न काही दुकाने  शासकीय रुग्णालयांशी संबंधित औषध दुकाने बंदमध्ये सहभागीनसल्याने त्यांना त्यांच्याकडे अतिरिक्त औषध साठा ठेवण्याची विनंती करण्यात आली आहेतसेच नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे कीत्यांना नियमितपणे लागणाऱ्याऔषधांचा साठा औषध विक्रेत्यांचा बंद सुरु होण्याआधिच त्यांच्याकडे करुन घ्यावाजेनेकरुन गैरसोय टाळता येईलजनतेला आवश्यक वेळेत  नियमित औषध उपलब्ध करणेहे परवाना धारकाचेप्रशासनाचे  शासनाचे कर्तव्य आहेऔषध विक्रेत्यांच्या बंदच्या काळात औषध उपलब्धतेबाबत ग्राहकांना अन्न  औषध प्रशासन विभागाच्या 0724-2420277 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा औषध निरिक्षक तथा सहायक आयुक्त (औषधेश्री एचवायमेतकर यांच्या 9730155370 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.