जो इतिहास विसरतो, तो इतिहास घडऊ शकत नाही- इंजि.अरविंद माळी

0
103
सडक अर्जुनी,दि.08ः-जो व्यक्ती आपला इतिहास विसरतो तो कधीही इतिहास घडऊ शकत नाही. इतिहास तोच घडवतो ज्याला स्वतःच्या इतिहासाची जाणीव असते.त्यासाठी आपल्या व आपल्या पुर्वजांच्या इतिहासाची जाणिव आपल्याला असणे नितांत गरजेचे आहे.आज आपण इग्रंजाच्या गुलामीतून स्वातंत्र्य झालो असलो तरी वैचारिक,सामाजिक स्वातंत्र्येत आजही गुलामच आहोत. १९४७ ची स्वातंत्रता चळवळ ही मूठभर मनुवादी लोकांसाठी होती. त्यामुळे आपल्या समाजातील लोकांना आजही वैचारिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळू शकलेले नाही.आता आपल्याला समाजाच्या स्वातंत्र्यासाठी परत लढाई करायची आहे.त्यासाठी आपल्या समाजाला एकत्रित येण्याची नितांत गरज असल्याचे विचार बहुजन विचारवंत इंजि.अरविंद माळी यांनी व्यक्त केले.
ते ओबीसी संघर्ष कृती समिती तालुका सडक अर्जुनीच्या वतीने येथील ग्राम राका येथील नवजीवन विद्यालयात आयोजित(दि.4) ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते. यावेळी सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे, ओबीसी विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष सालेकसा राहुल हटवार,शिवाजी गाहाने, भूमेस्वर चव्हान, सरपंच सौ.रेखाताई चांदेवार, डी.वाय.कटरे, वसंता उप्रिकर उपसरपंच, पुष्पा खोटेले, किरण हटवार, रंजना भोई, माया चौधरी, शंकर मेंढे त.मु.स.अध्यक्ष, दिनेश कोरे, इश्वर कोरे, विलास शिवणकर, अनिल बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संजय चांदेवर यांनी केले तर प्रस्तावन दिनेश हुकरे यांनी मांडली.आभार सोमनाथ मेंढे यांनी मानले. याप्रसंगी राका येथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे गठण करण्यात आले.प्रशिक्षणाला परिसरातील 500 कार्यकर्ते उपस्थित होते.