सानगडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा सुरू

0
23
साकोली,दि.१६: नवरात्राच्या शुभमुर्हतावर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सानगडी येथे मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल यांच्या हस्ते एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धनपाल उंदीरवाडे, सौ. सरीताताई फुंडे, सौ. उषाताई करपते, जनार्धन डोंगरवार, अशोक लिचडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी वर्षाताई पटेल म्हणाल्या की, जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांची जिव्हाळ्याची बँक असून शेतकर्‍यांच्या सुविधांकरीता हा पुढाकार घेवून एटीएम सुरू केले. डीजीटीएल जमाण्यात आमचा शेतकरी हा देखील तंत्रज्ञान शिकला पाहिजे, या उद्देशाने व त्यांच्या सुख सोयीसायी व वेळेची बचत करण्यासाठी एटीएम सुविधा करण्यात आली. शेतकर्‍यांना ऐवढेच सांगणे आहे की, सायबर क्रईम दिवसेंदिवस फोफावत असल्याने शेतकर्‍यांनी सावध असणे गरचेजे आहे. भाजप सरकार ही फसवेगीरीची सरकार असून मोठ’-मोठे आश्वासनाची वलगना करून अक्षरश: सामान्याचे कंबरडे मोडलेले आहे. अशा सरकारला येणार्‍या काळात धडा शिकवण्यासाठी सर्व महिला भगिनींनी एकत्र होणे ही काळाची गरज आहे. अशा प्रसंगी सौ. वर्षाताई पटेल म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे म्हणाले की, बँक शेतकर्‍यांकरीता व बँकेच्या ग्राहकांकरीता नेहमीच सकारात्मक भूमिकेत काम करीत असते. एकूणच शेतकर्‍यांची बँक म्हटंल्याव ग्रामीण भागातील शाखेंमध्ये होणारी गर्दी व ग्राहकांना बँक सेवेचा लागणारा वेळ या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रत्येक शाखेत एटीएम केंद्र सुरू करण्याचा मानस केला आहे. या सेवेचा शेतकरी बाधंवांनी लाभ घ्यावा असे प्रसंगी बोलले. विशेष म्हणजे आमचे एटीएम कधीच बंद पडणार नाही, व एटीएम मध्ये २४ तास कॅशची सुविधा राहणार असल्याचेही प्रसंगी सांगितले. नवरात्रीच्या उत्सवात ११ एटीएम सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अनिल टेंभरे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सानगडीचे कर्मचारी व गावकरी मो’्या संख्येने उपस्थित होते.