तेंदु पानपुड्यांच्या बोनस वाटपामध्ये घोळ-निलजवासियांचा आरोप

0
9

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.26ः-गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी जंगलव्याप्त परिसरातील गावात मजुरांकडून तेंदुपत्ता संकलनाचे काम केले जाते. त्यानुरूप अर्जुनी मोरगाव तालुक्यात निलज येथे सन २0१७-१८ मध्ये पानपुड्याची फडी सुरू करणत आली होती. त्यानुरूप येथील मुन्शी यांनी मजुरांकडून येणार्‍या पानपुड्यांची खरेदी केली. परंतु महाराष्ट्र शासनाच्या बोनस मिळणार्‍या हव्यासापोटी गावकर्‍यांचे तेंदुपत्ता पूर्णपणे रजिस्टर वरती नोंद न करता स्वत:च्या नातेवाईक व मित्रमंडळीच्या नावाने मुन्शी यांनी नोंद केल्याचे गावकर्‍यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती मागवली असता उघड झाले आहे. त्यामुळे निलज येथील पानपुड्याच्या बोनस वाटपामध्ये घोळ झाल्याने मजुरांवर झालेला अन्याय दूर करण्यात यावा. अन्यथा अर्जुनी मोरगाव येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा अन्यायग्रस्त मजुरांनी दिला आहे. विशेष म्हणजे यापुर्वीच बेरार टाईम्सने वनविभागातील काही कंत्राटी कर्मचार्यांनी तेंदुपानपुड्याच्या बोनसमध्ये घोळ केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
तालुक्यातील निलज येथे तेंदुपत्ता संकलनाचे काम सन २0१७-१८ मध्ये मजुरांकडून करण्यात आले. फडीवर तेंदुपत्ता संकलनाकरीता मजुरांकडून जास्ती प्रमाणात आणल्या जात असतानासुद्या येथील फडीमुंन्शी यांनी स्वत:च्या नातेवाईकांच्या व मित्र मंडळाच्या नावाने पुड्यांची नोंद केली. ही बाब निलज ग्रामस्थानच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती मागितली असता त्यामध्ये असे दिसून आले की, एका व्यक्तिचे ५00 पुडे मोजमाप करतेवेळी होते. मात्र नोंद करणार्‍या रजिष्टरवर ३00 पुड्यांची नोंद दिसून आली. यातील २00 पुड्यांची नोंद फडीमुन्शी यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने चढविल्याचे निदर्शनात आले. मात्र फडीमुंन्शी यांच्याकडे खरेदी विक्री साठ्यांची नोंद असलेला रजिष्टर अर्जुनपयर्ंत व माहिती अधिकार घातल्यानंतर सुद्या वनविभागामार्फत त्यांना देण्यात आला नाही. यासंदर्भात ग्रामस्थानी वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्राव्दारे कडवून ग्रामसभा आयोजित केली. या सभेला वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मात्र फडीमुंन्शी यांची अनुपस्थिती असल्याने गावकर्‍यांनी यासंदर्भातील तक्रारही अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यांत केली. तक्रार करूनसुद्धा चार ते पाच दिवसाच्या अवधीनंतर संबंधित विभागाने यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी या प्रकरणात टाळाटाळ करीत असल्याने तेंदुपत्ता संकलन करणारे कामगार बोनसच्या लाभापासून वंचित राहीले.
याचा लाभ मात्र, फडीमुंन्शी यांच्या नातेवाईकाना व मित्रमंडळीला मिळणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात फडीमुंन्शी व कर्मचारी यांची चौकशी करून तेंदुपत्ता संकलन करणार्‍या मजुराना न्याय देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही निलज येथील सुधाकर दहिवले, राजेंद्र लाडे, दामोधर कापगते, गुना कापगते, अशोक वैद्य व इतर नागरिकांनी दिला आहे.