‘दिशा’ मुलींच्या वसतिगृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

0
14
  • कायदेविषयक पुस्तकांचे वाटप

वाशिम, दि. २६ :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने २५ नोव्हेंबर रोजी येथील ‘दिशा’ मुलींच्या वसतिगृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना कायदेविषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, बाल न्यायमंडळच्या अध्यक्ष न्यायाधीश डॉ. यु. टी. मुसळे, न्यायाधीश के. के. चौधरी, न्यायाधीश आर. आर. पांडे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया, कोषाध्यक्ष अॅड. श्रद्धा अग्रवाल, व्यवस्थापक गोपाल मोरे, विधी तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, समुपदेशक आशिष अवचार, बाल न्याय मंडळाच्या सदस्य श्रीमती राठोड, मोतीराम खडसे, बाबाराव घुगे, वनमाला पेंढारकर, संगीता देशमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. देशपांडे म्हणाले, मुलींना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपले हक्क, अधिकार व बचावासाठी असलेल्या कायद्याची माहिती घेण्यासाठी मुलींनी कायदेविषयक पुस्तकांचे वाचन करावे.लैंगिक अत्याचार रोखणे, तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी मुलींनी कायदेविषयक वाचन करावे. तसेच आपल्याशी संबंधित कायदे जाणून घ्यावेत, असे मत न्यायाधीश मुसळे यांनी मांडले. जिल्हा संरक्षण अधिकारी आलोक आग्रहरी यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सचिव अॅड. प्रसाद ढवळे यांनी केले, आभार उपाध्यक्ष अॅड. अमरसिंह रेशवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी सं. ना. जगताप, दि. म. देशमाने, डी. आर. राठोड, सी. एन. नेमाने, जे. डी. सोनोने यांनी सहकार्य केले.