भजन-दिंडी आंदोलनाला यश

0
7
लाखनी,दि.28ःः लाखनी येथील बहुचर्चित श्री मारोती देवस्थान, गुजरी चौक, लाखनी न्यासाच्या १० एकर जमिनीवर जी एम सी कंपनीला अवैध हस्तांतरण करण्यात आले होते. मधुकर गणपत हेडाऊ यांना कोणतेही अधिकार नसतांना ते हस्तांतरित करण्यात आले होते. या सर्व गोष्टी चा निषेध करण्यासाठी हनुमान मंदिर ते तहसील कार्यालय, लाखनी येथे भजन दिंडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. भजन आंदोलकांनी तहसीलदार, लाखनी मार्फत जिल्हाधिकारी यांना  जे एम सी कंपनीचे बांधकाम तात्काळ थांबवावे. तहसील कार्यालय व नगरपंचायत कार्यालय मार्फत देण्यात आलेल्या सर्व तात्पुरत्या परवानग्या रद्द करण्यात याव्यात. तहसीलदार, लाखनी मुख्याधिकारी नगरपंचायत, लाखनी तथा मधूकर गणपत हेडाऊ यांच्यावर तातडीने कारवाई करून निलंबन व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागण्या मागितल्या होत्या. यापैकी जे एम सी कंपनी च्या अकृषक मागणीबाबत काम तात्काळ थांबविण्यात आले असे लेखी आदेश तसेच अकृषक आदेश रद्द करण्यात यावे यावर उपविभागीय अधिकारी यांच्या कडे पत्रव्यवहार केला आहे असे तहसीलदार, लाखनी यांनी आंदोलकांच्या समोर सांगितले. तसेच अधिकार नसतांना प्रशासकीय अधिकारी यांना खोटी कागदपत्रे सादर केली याबाबत मधुकर हेडाऊ यांची विभागामार्फत चौकशी करण्याचे तोंड आदेश त्यांनी दिले.
 यावेळी नगराध्यक्षा ज्योति निखाडे, माजी सरपंच उर्मिला आगाशे, गीता कापगते, उत्तमराव वरकड, ऍड कोमल गभणे, विकास खेडीकर, कौस्तुभ भांडारकर, सुधाकर खेडीकर, गीता बेलखोडे, रीना भांडारकर, वसंत भदाडे, जगदीश भदाडे, प्रकाश आंबिलकर, जितेंद्र भदाडे, विठोबा भिवगडे, आकाश भैसारे, किशोर खेडीकर, नाना सिंगनजुडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होती.