१६ मार्च महिला लोकशाही दिन

0
9

गोंदिया, दि.९ : महिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी, वैयक्तिक समस्या व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्यांचे निराकरण करण्याकरीता महिला थेट तक्रार नोंदवू शकतील तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवू शकतील. १५ दिवस आधी सादर केलेल्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यात येईल. अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.