२४ तासात गारपीटीसह पावसाची शक्यता

0
18

गोंदिया, दि.९ : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनूसार येत्या २४ तासात जिल्हयामध्ये तुरळक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. गारपीट सुरु असतांना बाहेर जाण्याचे टाळावे. पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. शक्य असल्यास ज्या धान्याची कापणी झाली आहे. ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. गारपीटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच गारपीट सुरु असतांना वीजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे