आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारकार्ड गोंदियाच्या नाल्यामंध्ये

0
8
गोदिया,दि.30-आमगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६६ मधील हजारो मतदारांचे ओळखपत्र  २९ आक्टोंबरला गोंदिया शहरातील स्टेडीयम परिसरातील मनोहर म्युन्सीपल शाळेजवळील नाल्यांमध्ये आढळून आल्याने खळबळ माजली आहे.शाळेच्या मागील नालीमध्ये मतदारओळखपत्र पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नीरज संगतानी व आदेश शर्मा यांना कळताच त्यांनी मतदारओळखपत्र नालीमधून बाहेर काढून प्रसारमाध्यमांसह संबधित अधिकाèयांना माहिती दिली.जिल्ह्याबाहेर असलेल्या जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच रात्रीला 10 वाजेच्या सुमारास गोंदिया शहरात दाखल होताच त्यांनी याप्रकरणाचा आढावा घेतला आणि रात्री 12 वाजेच्या सुमारास गोंदिया शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली.
प्रकरणाची गंभीरता ओळखत निवडणुक उपजिल्हाधिकारी शुंभागी आंधळे यांनी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारी नायब तहसिलदार आर.एम.पालांदूरकर यांना घटनास्थळावर जाऊन संपुर्ण मतदारओळखपत्र ताब्यात घेऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले.पालांदूरकर यांच्या उपस्थितीत 500 ते हजार ओळखपत्र नालीमधून बाहेर काढण्यात आले.विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीसंदर्भात ईव्हीएम व व्हीव्हीपीटी मशीन तपासण्याचे कार्य गोंदियाच्या नव्या प्रशासकीय ईमारतीमध्ये सुरु असतानाच हे मतदारओळखपत्र बाहेर आढळून आल्याने खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील मतदारांचे ओळखपत्र भोपाळ येथून तयार करुन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात पोचविले जातात.त्यानंतर सर्व तहसिल कार्यालयाना वितरीत करुन मतदारांना वितरीत करण्याच्या सुचना दिल्या जातात.
या सर्व प्रकरणामुळे जिल्हाप्रशासनात खळबळ माजली असून याप्रकरणातील सर्व मतदारओळखपत्र हस्तगत करुन त्यांचा पंचनामा करुन याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले असून तपासानंतर दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांनी दिली